धुळे लाेकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी ४७ अर्जाची विक्री
By अतुल जोशी | Published: April 26, 2024 06:23 PM2024-04-26T18:23:46+5:302024-04-26T18:24:53+5:30
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना जारी झालेली आहे. त्यानुसार अर्ज विक्री व दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली.
धुळे :धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ४७ अर्जांची विक्री झाली असून, एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना जारी झालेली आहे. त्यानुसार अर्ज विक्री व दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली. यासाठी अर्ज घेण्यासाठी व दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र टेबलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पहिल्या दिवशी ४७ अर्जांची विक्री झालेली आहे. यात भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नावाने चार अर्ज घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही.