धुळ्यात ४९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Published: April 3, 2017 12:23 AM2017-04-03T00:23:22+5:302017-04-03T00:23:22+5:30

शहाद्यातील दोन नगरसेविका पतींसह तिघे ताब्यात : आझादनगर पोलिसांची कारवाई

49 lakh old notes were seized in Dhule | धुळ्यात ४९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

धुळ्यात ४९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

Next


धुळे : शहरातील  नटराज चित्र मंदिराजवळ आझादनगर पोलिसांनी रविवारी सायंकाळी एका कारमधून ४९ लाख ७८ हजार ५०० रुपयांच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या. याप्रकरणी पोलिसांनी शहादा येथील तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यापैकी दोघे नगरसेविकेचे पती आहेत़
शहाद्याहून नाशिककडे येणाºया कारमध्ये (क्ऱ एमएच ३९-जे ८६६३) ही रोकड  असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांना मिळाली होती़ सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास पथकाने पांढºया रंगाच्या कारला अडविले आणि  तिघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने कारची तपासणी केली असता डिक्कीमध्ये या जुन्या नोटा मिळून आल्या़ पोलिसांनी तिघांसह कार व रोकड जप्त केली आहे़  ही रोकड नाशिक येथे बदलण्यासाठी नेत असल्याचे तिघांनी पोलिसांना सांगितले.
आयकर विभागाला माहिती देणार
या कारवाईचा अहवाल सोमवारी आयकर विभागाला देण्यात येणार आहे़ त्यामुळे पुढील कार्यवाही आयकर विभागाचे अधिकारी करतील, असेही पोलिसांनी सांगितले़ या कारवाईत पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक गवई, पोक़ॉ. कुणाल पानपाटील, मनोज बागुल, अरुण चव्हाण, उमेश चव्हाण, मनोहर चव्हाण, विजय शिरसाठ यांचा सहभाग होता.
यांना घेतले ताब्यात
संतोष सुरेश वाल्हे (४३ रा़ शहादा उपनगर), साजीद ताहेर अन्सारी (४५ गरीब नवाजनगर, शहादा) व अजय लक्ष्मीकांत छाजेड (३०, रा़ सुवर्णनगरी, शहादा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. यापैकी साजीद व संतोष हे दोघे नगरसेविकांचे पती, तर अजय हा वाळू ठेकेदार आहे. अजयवर  दोन ते तीन गुन्हे दाखल असून बनावट पावत्यांद्वारे वाळू पुरविल्याप्रकरणी त्याला ठाण्यात अटकही झाली होती.

Web Title: 49 lakh old notes were seized in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.