धुळ्यात चौथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन

By अतुल जोशी | Published: February 19, 2024 06:12 PM2024-02-19T18:12:09+5:302024-02-19T18:12:24+5:30

या साहित्य संमेलनाचे उद्घाटक प्रा.डॉ.वासुदेव मुलाटे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते होईल.

4th State Level Ahirani Literary Conference in Dhule | धुळ्यात चौथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन

धुळ्यात चौथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन

धुळे : अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि विद्यावर्धिनी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ३ मार्च, २०२४ रविवार रोजी एकदिवसीय चौथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आहे. स्व.अण्णासाहेब सदाशिवराव माळी साहित्यनगरी, विद्यावर्धिनी सभेचे प्रा.मा.य.वैद्य कला, प्रा.पी.डी. दलाल वाणिज्य व डॉ.दौलतकुमार शहा विज्ञान महाविद्यालय साक्री रोड धुळे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत हे संमेलन होईल. 

या साहित्य संमेलनाचे उद्घाटक प्रा.डॉ.वासुदेव मुलाटे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रतिमा परदेशी (पुणे), प्रा.डॉ.रामकिसन दहिफळे असतील. स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रा.शरद पाटील असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष अक्षय छाजेड असतील. सात सत्रांत विविध कार्यक्रम होणार आहे. यात चर्चासत्र, कथाकथन, काव्य संमेलन आदींचा समावेश आहे. सायंकाळी ६ ते ७ यावेळेत संमेलनाचा समारोप व गौरव सोहळा होणार आहे. 

समारोपाच्या अध्यक्षस्थानी आमदार कुणाल पाटील असतील, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.वासुदेव मुलाटे असतील. यावेळी माजी प्राचार्य सदाशिव माळी, शकुंतला बोरसे-कुंभार, माजी कुलगुरू डॉ.एन.के. ठाकरे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे, तर आशा रंधे, डी.डी. पाटील, प्रा.व्ही.के. भदाणे, सुनील गायकवाड, बी.एन. पाटील, अविनाश पाटील विश्राम बिरारी, प्रवीण पवार यांचा सन्मान केला जाणार आहे. संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.भगवान पाटील यांनी केले आहे.

Web Title: 4th State Level Ahirani Literary Conference in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे