वाह रे चोर! वीज खांब वाकवून ५० हजारांची वायर केली लंपास

By देवेंद्र पाठक | Published: November 30, 2023 06:03 PM2023-11-30T18:03:31+5:302023-11-30T18:03:55+5:30

धुळे तालुक्यातील सातरणे गावशिवारातील घटना.

50 000 worth of wire was broken by bending the electricity pole | वाह रे चोर! वीज खांब वाकवून ५० हजारांची वायर केली लंपास

वाह रे चोर! वीज खांब वाकवून ५० हजारांची वायर केली लंपास

देवेंद्र पाठक, धुळे : चोरट्याने आता विजेच्या पोलकडे लक्ष वेधले आहे. सिमेंटचे दोन पोल चोरट्याने वाकविले आणि ५० हजार रुपये किंमतीची वायर शिताफीने लांबविली. ही घटना धुळे तालुक्यातील सातरणे शिवारात ९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे तालुक्यातील नवलनगर कक्षाचे कनिष्ठ अभियंता रोहित अशोक जाधव (वय ३१, रा. पाटीलवाडा, शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, धुळे तालुक्यातील सातरणे गाव शिवारातील शेतकरी जिजाबराव सुकदेव पाटील यांच्या शेतातील एका डीपीमधून चोरट्याने इलेक्ट्रीक वायर लंपास केल्याचे आढळून आले. वायरची चोरी करत असताना चोरट्याने सिमेंटचे दोन पोल देखील वाकविले आहेत. लघुदाब वीज वाहिनीकरिता असलेल्या एकूण १७ पोलवरील सुमारे २ हजार ५५० मीटर तारा असे एकूण ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने शिताफीने लांबविला. चोरीची ही घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजेच्या पूर्वी घडली. चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर चोरट्याचा शोध घेण्यात आला. त्याचा काही उपयोग झाला नाही. याप्रकरणी बुधवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहेत.

Web Title: 50 000 worth of wire was broken by bending the electricity pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.