खुडाणे परिसरात बिबट्याच्या हल्यात ५०० कोंबड्यांच्या पिल्लांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:36 PM2018-03-21T12:36:57+5:302018-03-21T12:36:57+5:30
शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्ताची मागणी
आॅनलाइन लोकमत
निजामपूर, जि.धुळे-साक्री तालुक्यात माळमाथ्यावर बिबट्याने, धुमाकूळ घातलेला आहे. खुडाणे येथे पोल्ट्री फार्म मध्ये घुसून २०-२२ दिवसांच्या ५०० कोंबडींच्या पिल्लाचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.
खुडाणे येथील राकेश बाळू आघाव यांचा गावापासून काही अंतरावर डोमकानी रस्त्यावरील शेतात पोल्ट्री फार्म आहे.बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास बिबट्या पोल्ट्री फार्मची जाळी उचकवून आत घुसला. इन्व्हर्टरच्या प्रकाशात राकेशच्या वडिलांना बिबट्या दिसला. बिबट्या दिसताच ते तेथून निघून घेले. पोल्ट्रीफार्ममध्ये २०-२२ दिवसांची ५०० कोंबड्यांची पिल्ले होती. बिबट्याने पोल्ट्री फार्ममध्ये थैमान घातले. सकाळी पाहिले असता तेथे १००-१२५ कोंबड्यांची पिल्ले मृतावस्थेत पडलेली होती. उर्वरित मेलेल्या पिलांचा मागमूसही दिसला नाही. बिबट्याने किती मारली व किती खाल्ली ते कळू शकते नाही.मात्र सर्वच्या सर्व ५०० कोंबड्यांची पिल्ले मेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात डोमकानी येथे बिबट्याने गाय फस्त केली होती. कोंडाईबारी वनक्षेत्राचे रेंजर निकात यांनी वनपालास घटनास्थळी पाठविले असल्याचे सांगितले.