55 हजार दहावी-बारावी विद्याथ्र्याची परीक्षा

By admin | Published: February 20, 2017 12:48 AM2017-02-20T00:48:40+5:302017-02-20T00:48:40+5:30

वार्षिक परीक्षा तयारीला वेग : बारावीचे 25 हजार, तर दहावीचे 30 हजार विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट

55 thousand 10th-12th standard exam | 55 हजार दहावी-बारावी विद्याथ्र्याची परीक्षा

55 हजार दहावी-बारावी विद्याथ्र्याची परीक्षा

Next

धुळे : दहावी-बारावीच्या वार्षिक परीक्षेची शिक्षण विभागामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. इयत्ता बारावीसाठी 25 हजार 573 रुपये विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर इयत्ता दहावीसाठी 30 हजार 280 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
इयत्ता बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता दहावीची परीक्षा 7 मार्च ते 1 एप्रिल या कालावधित होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी भावना पाटील यांनी दिली.
बारावीसाठी 43 केंद्र
इयत्ता बारावीसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 42 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये 7 केंद्र आहेत, तर धुळे ग्रामीणमध्ये 14 केंद्र आहेत. साक्री तालुक्यात 9 केंद्र आहेत. तर शिरपूर तालुक्यात 7 केंद्र आहेत. शिंदखेडा तालुक्यात 6 केंद्र आहेत.
दहावीसाठी 62 केंद्र
इयत्ता दहावीची एकूण 62 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये 13 केंद्र आहेत, तर धुळे ग्रामीणमध्ये 17 केंद्र आहेत. साक्री तालुक्यात 12 केंद्र आहेत. शिरपूर तालुक्यात 9 केंद्र आहेत, तर शिंदखेडा तालुक्यात 11 केंद्र आहेत.
चार भरारी पथके
परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून चार भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके तैनात राहणार आहेत.
आठ ठिकाणी कस्टडी
प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये  धुळे शहर व ग्रामीणसाठी 3 कस्टडी, साक्री तालुक्यासाठी दोन कस्टडी, शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडी, शिंदखेडा तालुक्यासाठी 2 कस्टडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परीक्षेच्या नियोजनाबाबत नुकतीच नाशिक येथे विभागीय स्तरावर बैठक झाली. यामध्ये परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
केंद्रप्रमुखांच्या बैठका
परीक्षेच्या तयारीसाठी शिक्षण विभागाकडून यापूर्वीच केंद्रप्रमुखांच्या बैठका घेऊन प्रत्येक केंद्रावर परीक्षा सुरळीत कशी पार पाडावी, परीक्षेमध्ये गोपनीय ठेवायच्या बाबी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात असणार आहे.
संवेदनशील केंद्रांवर नजर
दहावी-बारावीच्या संवेदनशील केंद्रांवर भरारी पथकांची नजर राहणार आहे. गेल्या वर्षी काही परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या वेळी गोंधळ झाला होता. त्या परीक्षा केंद्रांना परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
कलचाचणी परीक्षा
सध्या शाळांमध्ये दहावीच्या विद्याथ्र्याची कलचाचणी परीक्षा सुरू आहे. 15 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत ही कलचाचणी परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इयत्ता दहावीसाठी कलचाचणी परीक्षेचे नियोजन शाळास्तरावर करावयाचे आहे. यासाठी शाळा नोंदणी, शिक्षक नोंदणी तत्काळ करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
याबाबत 6 फेब्रुवारी रोजीच शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेतली होती. तसेच तालुकानिहाय शाळास्तरावर कलचाचणीचे कामकाज सांभाळणारे शिक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
विद्याथ्र्याचा कल जाणून घेणे
विद्याथ्र्याचा कल जाणून घेण्यासाठी ही कलचाचणी घेण्यात येत आहे. त्याच्या कलानुसार दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावयाचा याबाबत मार्गदर्शनही विद्याथ्र्याना करण्यात येणार आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा
सध्या इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. विज्ञान विभागासाठी या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षा जवळ आल्यामुळे शिक्षण विभागाबरोबरच विद्याथ्र्याच्या परीक्षेच्या तयारीलाही वेग आलेला दिसून येत आहे.
इयत्ता बारावीसाठी धुळे शहर, धुळे ग्रामीण व साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातून 25 हजार 573 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये धुळे शहरमध्ये 6 हजार 42, धुळे ग्रामीण 6 हजार 907, साक्री तालुका 5 हजार 57, शिरपूर तालुका 3 हजार 940, शिंदखेडा तालुका 3 हजार 627 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या सर्व विद्याथ्र्याच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन शिक्षण विभागामध्ये सुरू आहे.
दहावीची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या
4इयत्ता दहावीसाठी धुळे शहरमधून 7 हजार 497, धुळे ग्रामीणमधून 4 हजार 818,  साक्री तालुक्यातून 6 हजार 226, शिरपूर तालुक्यातून 4 हजार 964,  शिंदखेडा तालुक्यातून 4 हजार 775 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. एकूण 30 हजार 280 विद्याथ्र्याची परीक्षा होणार आहे. यासंदर्भात सर्व सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
4दहावीच्या विद्याथ्र्याची प्रवेशपत्र सर्व शाळांना प्राप्त झाली आहेत. शहरातील जे.आर.सिटी हायस्कूल येथून याचे वाटपही करण्यात आलेले आहे. दहावीच्या सध्या प्रात्यक्षिक परीक्षाही शाळांमध्ये सुरू आहेत. याबाबत सर्व सूचना शाळांना दिल्या आहेत.

Web Title: 55 thousand 10th-12th standard exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.