553 परीक्षार्थीची परीक्षेला दांडी
By admin | Published: March 13, 2017 01:13 AM2017-03-13T01:13:40+5:302017-03-13T01:13:40+5:30
पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा : 3 हजार 790 परीक्षार्थीची उपस्थिती
धुळे : पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत 553 जणांनी दांडी मारली़ कोणत्याही प्रकारचा गोंधळ परीक्षेप्रसंगी झालेला नसल्याची जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी स्पष्ट केल़े
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई यांच्यामार्फत शहरातील 8 परीक्षा केंद्रांवर रविवारी पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा घेण्यात आली़ जिल्ह्यातील 4 हजार 343 उमेदवार परीक्षेसाठी नोंद केलेली होती़ त्यातील 3 हजार 790 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होत़े 553 विद्यार्थी अनुपस्थित होत़े
या परीक्षेसाठी 8 केंद्रप्रमुख, 52 पर्यवेक्षक, 189 समवेक्षक व 24 सहायक अशा एकूण 273 अधिकारी व कर्मचा:यांची नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली होती़ शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्याशाळा, कनोसा कॉन्व्हेंट स्कूल, जो.आर. सिटी हायस्कूल, जयहिंद हायस्कूल, एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल व तु.ता.खलाणे महाजन हायस्कूल या 8 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती़
या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होणार नाही, यासाठी आयोगामार्फत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन प्रशासनाकडून करण्यात आल़े
जिल्हाधिका:यांचे लक्ष
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक व भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी याकडे विशेष लक्ष दिले होत़े परीक्षा सर्व केंद्रांवर शांततेत पार पडली़