५७ हजार विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:16 PM2017-10-04T14:16:42+5:302017-10-04T14:18:01+5:30

 जिल्ह्यात फक्त २९हजार १३० विद्यार्थ्यांनीच  बॅँकेत खाते उघडले

57 thousand students free from uniform! | ५७ हजार विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचीत!

५७ हजार विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचीत!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ८८ हजार ५१६१९ सप्टेंबरपर्यंत २९ हजार १३० विद्यार्थ्यांनीच बँकेत खाते उघडलेगणवेशासाठी ३ कोटी ५४ लाखांचा निधी मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा



ेधुळे : अर्धे सत्र संपत आले तरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप बॅँक खाती उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे  जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार ३८६ विद्यार्थी अद्यापही मोफत गणवेशापासून वंचीत आहेत. 
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत  गणवेश देण्यात येतो. यासाठी विद्यार्थ्याचे आई अथवा वडीलांसोबत राष्टÑीयकृत बॅँकेत संयुक्त खाते उघडणे बंधनकारक आहे. 
विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्सने बॅँकेत खाते उघडावेत असे रिझर्व्ह बॅँकेचे सर्वच राष्टÑीयकृत बॅँकाना  निर्देश आहेत.  मात्र अनेक ठिकाणी राष्टÑीयकृत बॅँका विद्यार्थ्यांचे  झिरो बॅलन्सवर खाते उघण्यास टाळाटाळ करीत आहे. जोपर्यंत विद्यार्थ्याचे खाते उघडले जात नाही, तोपर्यंत त्याच्या नावावर गणवेशाची रक्कम जमा होवू शकत नाही.
 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळावा म्हणून शासनातर्फे दोन टप्यात ३ कोटी ५४ लाख ६०४ रूपये मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र बँकाचीच नकार घंटा असल्याने, अनेक विद्यार्थी प्रथम सत्रात गणवेशापासून वंचीत असल्याचे चित्र आहे.
सर्व शिक्षा अभियान विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात मोफत गणवेश लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ८८ हजार ५१६ इतकी आहे.  त्यात १९ सप्टेंबर अखेरपर्यंत २९ हजार १३० विद्यार्थ्याचे  बॅँक खाती उघडण्यात आलेली आहेत. उर्वरित ५७ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी अद्यापही बॅँकेत खाती उघडलेली नाही. 
दरम्यान  विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांकडे गणवेश पावत्या सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांनी पावत्या सादर केल्या, त्यांच्याच खात्यावर ४०० रूपये वर्ग करण्यात येत आहे. मात्र पावत्या सादर करणाºया विद्यार्थ्यांची संख्याही खूपच कमी आहेत. त्यामुळेही अनेकजण गणवेशाच्या लाभापासून वंचीत आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी गणवेश घेतला की नाही याची खात्री देणे शिक्षण विभागातील अधिकाºयांनाही शक्य नाही.नाही.



 

Web Title: 57 thousand students free from uniform!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.