रामी गावात ५८ हजारांचा ऐवज लांबविला, दोंडाईचा पोलिसात गुन्ह्याची नोंद
By देवेंद्र पाठक | Published: July 13, 2023 06:42 PM2023-07-13T18:42:00+5:302023-07-13T18:42:24+5:30
शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात बंद घर फोडून राेख रकमेसह दागिने असा ५८ हजारांचा ऐवज लांबविला.
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात बंद घर फोडून राेख रकमेसह दागिने असा ५८ हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना रविवारी पहाटे घडली असून बुधवारी दोंडाईचा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. जयपालसिंग सुबेरसिंग राजपूत यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, राजपूत परिवार हा कुठे बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते.
बंद घराचा चोरट्याने फायदा उचलला. घराचा कडी कोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरात शोधाशोध केली. सामान अस्ताव्यस्त फेकून दिला. समानाची शोध शोध करीत असताना त्यांनी ३० हजार रुपयांची राेख रक्कम,२८ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५८ हजाराचा ऐवज लांबविला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर ते रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. राजपूत परिवार घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाबा दोंडाईचा पोलिसात कळविली.
घरातून नेमका कितीचा ऐवज लंपास करण्यात आला याची माहिती संकलित केल्यानंतर ३० हजार रुपये रोख रक्कम आणि २८ हजार रुपये किमतीचे दागिने असा एकूण ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास दोंडाईचा पोलिस करीत आहेत.