सेट परीक्षेला ५८७ परीक्षार्थींची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:40+5:302021-09-27T04:39:40+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा ॲाफलाईन पद्धतीने धुळे शहरातील १० केंद्रांवर घेण्यात आली. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा ॲाफलाईन पद्धतीने धुळे शहरातील १० केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण ३७६९ परीक्षार्थींची नोंदणी झालेली होती. प्रत्यक्षात ३ हजार १८२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली, तर ५८७ जणांनी दांडी मारली होती. परीक्षेसाठी परीक्षक म्हणून अनिलकुमार सिंग (आग्रा) व एम. आर. संघवी (नाशिक) यांनी काम पाहिले.
तीन गुणांचे दोन पेपर झाले. यात १०० गुणांचा पेपर सकाळी १० ते ११ व २० गुणांचा पेपर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत झाला.
दरम्यान पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा हॅालचे सॅनिटराईज करण्यात आलेले होते. तसेच पेपर सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळच परीक्षार्थींचे तापमान मोजण्यात आले होते. परीक्षा हॅालमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. परीक्षा सुरळीत पार पडल्याचे केंद्र सहसंचालक डॅा. एस.व्ही. शिंदे यांनी सांगितले.