शिंदखेडय़ाच्या पाणी योजनेसाठी 6 कोटी
By Admin | Published: January 22, 2017 12:16 AM2017-01-22T00:16:08+5:302017-01-22T00:16:08+5:30
जयकुमार रावल : पहिला हप्ता प्राप्त
दोंडाईचा : शिंदखेडा शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेसाठी शासनाकडून पहिल्या हप्तापोटी 6 कोटी 23 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शिंदखेडा पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न प्रलंबित होता. राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पाठपुरावा करून या योजनेला मंजुरी मिळून दिली. या मंजुरीचे पत्र गटनेते प्रा. सुरेश देसले आणि अनिल वानखेडे यांना दिले होते. त्यानुसार आता राज्य शासनाने या योजनेच्या पहिल्या हप्तापोटी 6 कोटी 23 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे या निधीतून आता प्रत्यक्ष योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेसाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
दरम्यान, कायम टंचाईग्रस्त म्हणून शिंदखेडाकडे पाहण्यात आलेले आह़े त्यामुळे तातडीने ही योजना मार्गी लागल्यास नागरिकांना फायदा होईल़