६ मृत्यू तर ११५ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:01 PM2020-09-09T22:01:49+5:302020-09-09T22:02:25+5:30

कोरोना रिपोर्ट : जिल्ह्यात बाधितांची संख्या १० हजार ३५९ वर पोहोचली

6 deaths and 115 patients positive | ६ मृत्यू तर ११५ रुग्ण पॉझिटिव्ह

dhule

Next

धुळे : जिल्ह्यात मंगळवारी एकूण ११५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १० हजार ३५९ झाली आहे. बुधवारी कोरोनाने आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांची संख्या ३०६ झाली आहे.
बुधवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ४५ तर ग्रामीण भागातील ७०अशा एकूण ११५ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या १० हजार ३५९ इतकी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सहा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे़ त्यात धुळयातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यात नवे भामपूर येथील ५९ वर्षीय , नकाणे ता.धुळे येथील ७३ वर्षीय, मोहाडी येथील ८० वर्षीय, अंबिका नगरातील ५८ वर्षीय आणि शिरपूर येथील ७५ वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. तर खाजगी रुग्णालयातील म्हसाळे येथील ८० वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३०६ झाली आहे.
जिल्हा रुग्णालय -
येथील २२४ अहवालांपैकी ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात बाळापुर १, अजंग १, वलवाडी १, शासकीय दुध डेअरी जवळ १, काळखेडे १, शनिनगर साक्री रोड १, अंचाळे तांडा १, राजदीप सोसायटी १, कुसुंबा १, फागणे ३, कापडणे ६, कुलथे २, दापुरा १, नरव्हाळ १, वरखेडी रोड १, नकाणे रोड १, रावळ वाडी १, मिल परिसर १, मार्केट यार्ड १, सुभाषनगर १, विंचूर १, सातरणे १, सोनगीर १, मोहाडी १ रुग्ण आढळला.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय -
येथील ४१ अहवालांपैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जखाने १, दरखेडा २, निमगुळ शिंदखेडा १, मांडळ चौफुली दोंडाईचा १, नंदुरबार रोड दोंडाईचा १, विद्या नगर दोंडाईचा १, हुडको कॉलनी दोंडाईचा ३, महादेवपुरा दोंडाईचा २, पोलीस स्टेशन जवळ दोंडाईचा २, सोनार गल्ली गांधी चौक १, देशमुख नगर १,जयहिंद कॉलनी दोंडाईचा ३ रुग्ण आढळून आले.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय -
येथील ११ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शिरपुर १ एकूण बाधीत आढळला.
भाडणे ता. साक्री कोविड सेंटर -
मधील ३८ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात म्हसदी १, चिकसे १, म्हसाळे २, इंदिरा नगर धाडने ३, आदर्श नगर साक्री १, खैरनार वाडा कासारे १ रुग्ण आढळला. येथे रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ५० अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
त्यात ग्रामपंचायत जवळ धाडणे १, मेन रोड पिंपळनेर १, सटाणा रोड पिंपळनेर १, मराठी शाळेजवळ आखाडे १, आरोग्य केंद्राजवळ
म्हसदी १, छत्रपती नगर साक्री १ रुग्ण आढळला.
महानगरपालिका पॉलिटेक्निक
मधील १३० अहवालांपैकी ३० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात साक्रीरोड २, पवननगर ३, रेल्वे स्टेशन रोड २, देवपूर २, नागसेन नगर १, राजसारथी सोसायटी देवपूर १, देवकीनंदन सोसायटी १, नेहरूनगर १, वालचंद बापुजी नगर १, मातोश्री नगर १, वाडीभोकर रोड १, जय मल्हार नगर १, यशवंतनगर १, वर्षा वाडी १, गल्ली नंबर ६ मध्ये १, जुने धुळे १, विटा भट्टी १, राजवाडे नगर चाळीसगाव रोड १, भोई सोसायटी १, आरती कॉलनी १, चितोड रोड १, मच्छी बाजार १, नकाणे रोड १, अभियंता नगर २ रुग्ण आढळले.
शासकीय महाविद्यालय
येथील २६ अहवालांपैकी ९ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात मेहेरगाव १, जीएमसी २, धुळे इतर ३, अरिहंत भवन १, लळिंग १, साक्री रोड १ रुग्ण आढळला.
खाजगी लॅब -
मधील १९ अहवालापैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात बेहेड १, भास्कर नगर दोंडाईचा १, वायपूर शिंदखेडा १, बंसिलाल नगर शिरपूर १, पाच कंदील धुळे १, चाळीसगाव रोड धुळे १, सिंधी कॉलनी दोंडाईचा १, खालचे गाव शिरपूर २ रुग्ण आढळले.
नागरिकांनी जबाबदारीने वागावे !
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ही चिंतेची बाब असली, तरी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत 8 हजारांवर रुग्ण बरे होवून आपापल्या घरी परतले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकायार्ची तेवढीच आवश्यकता आहे. माझे नागरिकांना नम्र निवेदन आहे, की त्यांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावाच. तसेच सोशल डिस्टन्स ठेवावे. तसे करणे आपल्या कुटुंबासाठी व समाजाच्या सुरक्षिततेसाठी ते आवश्यक आहे. ह्यकोरोनाह्ण काळात नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत जबाबदारीने वागावे. जेणेकरून कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वास आळा बसू शकेल.
- संजय यादव,
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, धुळे

 

Web Title: 6 deaths and 115 patients positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे