प्रशिक्षणाला १७० कर्मचाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 09:36 PM2019-12-29T21:36:50+5:302019-12-29T21:37:24+5:30

धुळे तालुका : खुलासा प्राप्त झाल्यावर कारवाई

 6 staff members trained for training | प्रशिक्षणाला १७० कर्मचाऱ्यांची दांडी

Dhule

Next

धुळे :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी धुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच झाले. या प्रशिक्षणाला १७० कर्मचाºयांनी दांडी मारली असून, त्यांना प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. खुलासे प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
धुळे तालुक्यातील कर्मचाºयांचे राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात प्रशिक्षण झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी मार्गदर्शन केले.
मतदानासाठी प्रशासनाने १ हजार ८०० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाईचा समावेश आहे. या सर्व कर्मचाºयांचा पहिला प्रशिक्षण वर्ग झाला. या वेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., तहसीलदार किशोर कदम यांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. भीमराज दराडे म्हणाले की, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. मतदान प्रक्रिया ईव्हीएमद्वारे होणार असल्यामुळे ईव्हीएम यंत्राची जोडणी, कार्यपध्दती व मतदान प्रक्रिया प्रत्येकाने समजून घ्यावी. प्रशिक्षणाला १७० कर्मचाºयांनी दांडी मारली. त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Web Title:  6 staff members trained for training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे