धुळे बाजार समितीत सहा हजार क्विंटल कांद्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:22 AM2019-01-05T11:22:12+5:302019-01-05T11:23:58+5:30
८०० रूपये प्रतिक्विंटल मिळाला भाव : कांदा उत्पादक समाधानी
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात कांद्याला मिळणाºया कमी भावामुळे शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले असले तरी, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला ८०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतून देण्यात आली.
गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यानुसार कांद्याचे उत्पन्नही भरघोस आले आहे. उत्पन्न वाढताच अनेक ठिकाणी कांद्याचे भाव घसरले. मातीमोल भाव मिळत असल्याने, काही ठिकाणी शेतकºयांनी कांदा फेकला. भाव मिळत नसल्याने शेतकºयांच्या डोळ्यातही पाणी आले.
मात्र धुळे कृउबामध्ये शुक्रवारी थोडाथोडके नव्हे तब्बल १२ हजार गोण्यांची (सहा हजार क्विंटल) कांद्याची आवक झाली. या कांद्याला ८०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने, शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण होते.