२४ दिवसात ६१ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 06:53 PM2020-08-25T18:53:09+5:302020-08-25T18:53:32+5:30

१ ते २४ आॅगस्ट - ४ हजार ९२ रूग्ण आढळले

61% of patients overcome corona in 24 days | २४ दिवसात ६१ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. आतापर्यंत पाच हजार ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांपैकी १ ते २४ आॅगस्ट या कालावधीत ६१ टक्के रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.
दरम्यान, आॅगस्ट मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. तसेच मृत्यू व नवे बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे.
२४ दिवसात ३ हजार २७६ रुग्ण झाले बरे
१ ते २४ आॅगस्ट या २४ दिवसांच्या काळात जिल्ह्यातील तब्बल ३ हजार २७६ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.
४ हजार ९२ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग
गत २४ दिवसात ४ हजार ९२ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ३०६ इतकी झाली आहे. आॅगस्ट महिन्यात बाधित रुग्णांमध्ये ५६ टक्के रुग्णांची भर पडली आहे.
१०७ रुग्णांचा मृत्यू
सोमवार अखेर जिल्ह्यातील २१५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आॅगस्ट महिन्यातच १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल होत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांचे म्हणणे आहे. बरेच रुग्ण आजारपणाच्या दुस?्या आठवड्यात रुग्णालयात येत आहेत त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

एकूण कोरोनामुक्त - ५३७९
१ ते २४ आॅगस्ट - ३२७६ कोरोनामुक्त (६१ टक्के)

एकूण पॉझिटिव्ह - ७३०६
१ ते २४ आॅगस्ट - ४०९२ पॉझिटिव्ह (५६ टक्के)

एकूण मृत्यू - २१५
१ ते २४ आॅगस्ट - १०७ मृत्यू (४९. टक्के)

Web Title: 61% of patients overcome corona in 24 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.