६३० किलो प्लास्टीक थैल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:01 PM2019-06-21T23:01:50+5:302019-06-21T23:03:30+5:30
शिरपूर : दुकानदाराला ५ हजाराचा दंड, नगरपालिका प्रशासनाची कारवाई
शिरपूर : शहरातील मेनरोडवरील नरेश पानमसाला दुकानावर नगरपालिकेच्या प्लॉस्टीक निर्मुलन पथकाने छापा टाकून ६३० किलो वजनाच्या प्लॅस्टीकच्या थैल्या जप्त करून संबंधित दुकानदारास ५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला़ प्लॅस्टीक थैल्या वापरणे बंदी असतांना हा साठा मिळून आला़
२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नरेश पानमसाला या दुकानावर छापा टाकण्यात आला़
सीईओ व प्लॉस्टिक निर्मुलन पथकाने टाकलेल्या धाडीत ६३० किलो वजनाच्या थैल्या जप्त करण्यात आल्यात़
संबंधित दुकानदार चालक संजय फुलचंद ओसवाल खडसावून ५ हजार रूपयांचा दंड करण्यात आला़ तसेच पर्यावरण कायदानुसार देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले़
या पथकात राकेश वाडीले, जितेंद्र अहिरे, सागर कुलकर्णी, दीपाली साळुंखे, विनय माळी, भटू माळी, प्रज्ञाशील निकम, प्रदीप गिरासे, सुनिल बारी, भूपेश सोनवणे, राजू पाटील, मुकेश अहिरराव, ब्रिजलाल माळी, प्रविण रणदिवे, विलास मराठे, अखतर मेहतर, विक्रम सारसर, शाहीद पटेल, मोहसीन मेहतर, जाकीर रफीक, महेंद्र करंकाळ, गणेश सारसर, राजू ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली़
पथक कारवाई करीत असतांना अनेकांनी दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी केली़