पहिल्या टप्प्यात 70 कोटी अनुदान प्राप्त!
By admin | Published: January 12, 2016 01:00 AM2016-01-12T01:00:57+5:302016-01-12T01:00:57+5:30
धुळे जिल्ह्यातील 617 गावांमधील नुकसानग्रस्त शेतक:यांसाठी शासनाने जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 70 कोटी 74 लाखांचा निधी दिला आह़े
धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामात अपु:या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल़े जिल्ह्यातील 617 गावांमधील नुकसानग्रस्त शेतक:यांसाठी शासनाने जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 70 कोटी 74 लाखांचा निधी दिला आह़े त्यामुळे शेतक:यांना काहीसा आधार मिळणार आह़े प्रशासनाकडून निधी वाटपाचे नियोजन करण्यात येत आह़े कापसासह बागायती क्षेत्र आणि फळपिकांचे नुकसान वगळून हा लाभ मिळाला आह़े गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याला कमी निधी मिळाला असल्याचे दिसून येत आह़े जिल्ह्याचे सरासरी पजर्न्यमान 530 मि़मी. आह़े यंदा सरासरीच्या 93 टक्के 495 मि़मी. पाऊस झाला़ मात्र तो अनियमित स्वरूपाचा होता़ यंदा मृग नक्षत्राला प्रारंभ होताच पावसाला सुरुवात झाली होती़ त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर महिना उलटूनही चांगला पाऊस झाला नाही़ ऑगस्टमध्ये मध्यंतरी काही दिवस जोरदार पाऊस झाला़ पुन्हा पावसाने दडी दिली़ त्यानंतर थेट सप्टेंबर महिन्याअखेर जोरदार पाऊस झाला़़ या अनियमित स्वरूपाच्या पावसामुळे खरीप हंगाम बहरलाच नाही़ पिकांचे अतोनात नुकसान झाल़े त्यामुळे शेतक:यांवर आर्थिक संकट कोसळल़े जिल्ह्यात नजर पैसेवारीत 676 गावांपैकी 614 गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली होती़ त्यानंतर ऑक्टोबरअखेर सुधारित पैसेवारी जाहीर झाली़ त्यात शिरपूर तालुक्यातील बाळदे, चांदपुरी व सावेर या तीन गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत असल्याने या तीन गावांचा त्यात समावेश करण्यात आला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 617 झाली होती़ 31 डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली़ त्यातही या 617 गावांचा समावेश आह़े या 617 गावांमध्ये धुळे तालुक्यातील सर्व 168, शिंदखेडा तालुक्यातील सर्व 143, साक्री तालुक्यातील सर्व 227 व शिरपूर तालुक्यातील 76 गावांचा समावेश आहे. अंतिम पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता़ त्यानंतर शासनाने राज्यात कोरडवाहू नुकसानग्रस्त शेतक:यांसाठी मदत जाहीर केली़ त्यात धुळे जिल्ह्यासाठी 70 कोटी 74 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आह़े