८ कोटी १२ लाख ९५ हजाराची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:27 PM2019-03-17T23:27:20+5:302019-03-17T23:27:36+5:30
लोकअदालत : सामंजस्याच्या भूमिकेतून प्रलंबित दावे निकाली काढण्यावर दिला भर
धुळे : सामंजस्याची भूमिका घेऊन प्रलंबित दावे निकाली काढावेत़ लोकअदालतीमध्ये दंड आकारणी कमी करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत़ तेव्हा मालमत्ता कराचा विषय लोकअदालतीत निकाली निघावा अशी अपेक्षा न्यायाधीश मंगला धोटे यांनी व्यक्त केली़
येथील जिल्हा न्यायालयात विधीसेवा प्राधीकरणाच्या पुढाकाराने लोकअदालत भरविण्यात आली़ लोकअदालतीचे उद्घाटन न्यायाधीश धोटे यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी त्या बोलत होत्या़ याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस़ आऱ उगले, एम़ जी़ चव्हाण, के़ आऱ राजपूत, ए़ एस़ नलगे यांच्यासह पॅनल सदस्य अॅड़ देवेंद्र तवर, जितेंद्र निळे, एस़ पी़ जैन, प्रतिभा पाटील, डी़ पी़ देवरे, जे़ एस़ पोतदार, एम़ एस़ पाटील, पी़ एम़ चौधरी, वकील संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त एस़ आऱ गोसावी यांच्यासह कर संकलन अधिकारी बळवंत रनाळकर, मालमत्ता निरीक्षक मधुकर निकुंभे, शिरीष जाधव, राजकुमार सूर्यवंशी, मुस्ताक शहबान, अजय देवरे तसेच महापालिकेच्या वसुली विभागातील ४५ कर्मचारी उपस्थित होते़
न्यायालयातील प्रलंबित १ हजार ४ प्रकरणांपैकी ३४९ आणि दाखलपूर्व २४ हजार ४४७ प्रकरणांपैकी १५ हजार ३५३ प्रकरणांचा निपटारा झाला़ लोकअदालतमध्ये ८ कोटी १२ लाख ९५ हजार २०२ रुपयांची नुकसान भरपाई आणि वसुली झाली़