साबरमती येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील १४७ कर्मचाऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:37 AM2019-10-01T11:37:37+5:302019-10-01T11:37:56+5:30

स्वच्छता ही सेवा अभियानाचा २ रोजी होणार समारोप

8 employees of Dhule district participate in Prime Minister's program in Sabarmati | साबरमती येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील १४७ कर्मचाऱ्यांचा सहभाग

साबरमती येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील १४७ कर्मचाऱ्यांचा सहभाग

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : गुजरात राज्यातील साबरमती येथे २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाºया ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील १४७ कर्मचारी, अधिकारी सोमवारी साबरमतीला रवाना झाले.
११ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. या अभियानात प्लॅस्टिक मुक्तीवर भर देण्यात आला आहे.
या अभियानाचा समारोप २ आॅक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साबरमती येथे होत आहे. या अभियानाच्या समारोपासाठी देशातून शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वच्छतागृही उपस्थित राहणार आहे. धुळे जिल्ह्यातून १४७ अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडीसेविका, स्वच्छतागृही या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्व कर्मचारी सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद धुळे येथून शिवशाही बसने साबरमतीकडे रवाना झाले.
पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांनी या सर्व कर्मचाºयांना निरोप दिला.

Web Title: 8 employees of Dhule district participate in Prime Minister's program in Sabarmati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे