बनावट दारु कारखाना उद्ध्वस्त धाडीत ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 07:16 PM2018-02-02T19:16:49+5:302018-02-02T19:18:59+5:30

शिरपूर तालुका : राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

8 lakhs worth of fake liquor factory seized | बनावट दारु कारखाना उद्ध्वस्त धाडीत ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट दारु कारखाना उद्ध्वस्त धाडीत ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देवासर्डी येथे बनावट दारूच्या मिनी कारखाना उदध्वस्त८ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल पथकाने केला जप्तपोलिसात गुन्ह्याची नोंद 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जि़ धुळे : तालुक्यातील वासर्डी येथे बनावट दारूच्या मिनी कारखाना उदध्वस्त केला. तसेच तालुक्यातील चोंदी सह अन्य ठिकाणीही धाड टाकून  एकूण ८ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या पथकाने जप्त केला.
 राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने १ फेब्रुवारीला रात्री  वासर्डी शिवारातील  नारायण अशोक पगारे-माळी यांच्या शेतात धाड टाकून त्याठिकाणी सुरु असलेला बनावट दारुचा कारखाना उदध्वस्त केला.  याठिकाणाहून  पथकाने  बनावट दारू तयार करण्याचे मशिन, ३६ बॉक्स बनावट देशी दारूसह १ हजार लिटर स्पिरीट व साहित्य   असा एकूण ३ लाख ४१ हजार ७५६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
पथकाने त्यानंतर बोराडी गावाजवळील चोंदी टेंभे येथेही धाड टाकली. येथूनही  दंबग बिअरचे १४९ खोक्यांसह २०० लिटर स्पिरीट जप्त केले. अशापद्धतीने रात्रीतून पथकाने   एकूण  ८ लाख ९१ हजार ८८६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.  राज्य उत्पादन विभाग व पोलिस यांच्या संयुक्त पथकाने पकडला़ मात्र पथकाला पाहून पाचही ठिकाणचे संशयित मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अनिल बिडकर, दशरथ क्षीरसागर, शैलेंद्र मराठे, अनिल निकुंभे, राजेश सोनार, अमोल भंडागे, पोलिस निरीक्षक संजय सानप, पीएसआय मुकेश गुजर,  अकील पठाण, विश्वास पाटील यांच्या पथकाने या धाडी टाकल्यात़ 
यासंदर्भात शिरपूर पोलिसात गुन्हे दाखल कारण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. 

Web Title: 8 lakhs worth of fake liquor factory seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.