धुळे जिल्ह्यात ‘आरटीई’साठी ९५९ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:21 AM2018-10-25T11:21:19+5:302018-10-25T11:22:39+5:30
९३ शाळांमध्ये ११८३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे उद्दिष्ट, प्रवेशासाठी नऊ फेºया झाल्या
आॅनलाइन लोकमत
धुळे :आर्थिकदृट्या दुर्बल तसेच वंचीत घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आरटीई अंतर्गत बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद केली आली. २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये १ हजार १८१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाचे उद्दिष्ट होते. मात्र पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू होण्याची वेळ आली तरी अद्याप प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत ९५९ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक श्क्षिण विभागातर्फे सांगण्यात आले.
आर्थिकदृट्या दुर्बल तसेच समाजातील वंचीत घटकातील बालकांना प्रवेश नाकारून विविध शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारून चांगल्याच गब्बर झाल्या होत्या. शाळांच्या या मनमानी कारभाराला शिक्षण हक्क कायद्यामुळे लगाम लागलेला आहे. याच कायद्यानुसार खाजगी शाळांना आता आर्थिक दुर्बल आणि वंचीत घटकांसाठी २५ टक्के प्रवेश राखून ठेवावे लागत आहेत.
धुळे जिल्ह्यात आरटीई मोफत प्रवेशाची सुरवात २०१३ पासून झाली. २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता १० फेब्रुवारी २०१८पासून आॅनलाईन नोंदणी सुरू झाली होती. ७ मार्च अखेरपर्यंत ९३ शाळांमधील १ हजार १८१ जागांसाठी एकूण १ हजार ४६५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते.
प्राप्त झालेल्या अर्जांमधून पहिली आॅनलाईन सोडत १२ मार्च रोजी सोडत काढण्यात आली. त्यात ५६८ विद्यार्थ्यांची लॉटरी लागली होती. मात्र निर्धारित वेळेत पहिल्या प्रवेश फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यासाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
दुसºया फेरीच्यावेळीही अशीच मुदतवाढ दिली होती. तिसºया फेरीच्या सोडतीला काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ लागला होता. त्यातनंतर नियमांमध्ये थोडा बदल करण्यात आला. त्यानंतर पुन्हा लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली.
आतापर्यंत नऊ फेºया झालेल्या आहेत. नऊ फेºयांअखेर जिल्ह्यातील ९५९ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली.
पुढील प्रवेशाबाबत अनिश्चितता
दरम्यान आता अनेक शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आता विद्यार्थी प्रवेश केव्हा घेणार? अभ्यास केव्हा करणार? व परीक्षा कधी देणार? असा प्रश्न निर्माण झालो आहे. त्यामुळे पुढील प्रवेशाबाबत अनिश्चितताच असल्याचे चित्र आहे.