धुळे जिल्ह्यातील दिव्यागांच्या मदतनीसांसाठी ९ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:53 AM2019-01-04T10:53:50+5:302019-01-04T10:55:15+5:30

जिल्ह्यातील १६४ पैकी  १५७ दिव्यांग विद्यार्थ्यांना  मदतनीस

9 lakh sanctioned for pilot helpers in Dhule district | धुळे जिल्ह्यातील दिव्यागांच्या मदतनीसांसाठी ९ लाख मंजूर

धुळे जिल्ह्यातील दिव्यागांच्या मदतनीसांसाठी ९ लाख मंजूर

Next
ठळक मुद्देविद्यार्थी ४० टक्के अपंग असणे गरजेचेनऊ महिन्यांसाठी भत्ता मंजूरमुलींच्या मदतनीसांची संख्या कमी


आॅनलाइन लोकमत
धुळे :  दिव्यांग विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची आवड असते. मात्र अपंगत्वामुळे ते स्वत: घरापासून शाळेपर्यंत  जाऊ शकत नाही. अशा जिल्ह्यातील १६४ पैकी  १५७ दिव्यांग विद्यार्थ्यांना  मदतनीस मिळाल्याने, ते शिक्षण पूर्ण करू शकत आहे.  या मदतनीसांना शासनामार्फत दरमहा ६०० रूपयांप्रमाणे नऊ महिने भत्ता दिला जातो.  या मदतनीसांसाठी ८  लाख ४७  हजार ८०० रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे.  तर जिल्ह्यातील २६ दिव्यांग विद्यार्थी स्वत: प्रवास करतात. त्यांनाही ६०० रूपयांप्रमाणेच भत्ता दिला जातो. त्यासाठी १ लाख  ४० हजार ४०० रूपयांची  तरतूद  करण्यात आलेली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यावर्षी एकूण ९ लाख ८८ हजार २०० रूपयांची समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत तरतूद केली आहे. 
इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी यासाठी लाभार्थी असतात. विद्यार्थी हा ४० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असणे गरजेचे आहे. गावात दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शाळा उपलब्ध नसल्यास, दुसºया गावातील शाळेत जाण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्याला  मदतनीस दिला जातो.
मदतनीसांना भत्ता
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तज्ज्ञांनी व विशेष शिक्षकांनी शिफारस केलेल्या विशेष गरजा असणाºया विद्यार्थ्यांना शाळेत नियमित ये-जा करण्यासाठी मदत करणाºया मदतनीसांना हा भत्ता देण्यात येतो. शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण, वॉर्ड शिक्षण समितीने नियुक्त केलेल्या बेरोजगार व्यक्तीस ६०० रूपये प्रतिमहा प्रोत्साहानात्मक भत्ता देण्यात येतो.
 ७५ टक्के उपस्थिती आवश्यक
मदतनीस भत्त्यासाठी संबंधित विद्यार्थी शाळेत ७५ टक्के उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी मदतनिसाची व्यवस्था नसल्यास शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम शिक्षण समितीच्या शिफारशीने स्वयंसेवकाची नेमणूक करता येते. दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्याला शाळेत सोडण्याचे काम घरातील व्यक्ती करीत असेल, त्यास मदतनीस भत्ता देण्यात येत नाही.
मुलींची संख्या कमीच
मुलींसाठी शासकीय सेवा सवलती योजनेअंतर्गत मोफत बस पास दिला जातो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाºया मुलींची संख्या नगण्य आहे. जिल्ह्यात फक्त ५२ मुलींना मदतनीस देण्यात आले आहेत.
स्वत: प्रवास करणारे दिव्यांग विद्यार्थी
 स्वत:प्रवास करणाºया दिव्यांगाची संख्या जिल्ह्यात  २६  इतकी आहे.   त्यांनाही प्रतिमहा ६०० रूपये भत्ता दिला जातो.



 

Web Title: 9 lakh sanctioned for pilot helpers in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे