धुळे जिल्हयातील ९ हजार विद्यार्थी देणार सीईटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:51 AM2018-05-06T11:51:38+5:302018-05-06T11:51:38+5:30

१० मे रोजी शहरातील २० केंद्रावर परीक्षा, परीक्षेसाठी ६६४ कर्मचाºयांची नियुक्ती

9,000 students in Dhule district will not be given CET exam | धुळे जिल्हयातील ९ हजार विद्यार्थी देणार सीईटी परीक्षा

धुळे जिल्हयातील ९ हजार विद्यार्थी देणार सीईटी परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील २० केंद्रावर होणार परीक्षापरीक्षेसाठी ८ हजार ९७६ विद्यार्थी प्रविष्ट६६४ कर्मचाºयांची नियुक्ती

आॅनलाइन लोकमत
धुळे : इंजिनियरिंग व मेडीकल अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा १० मे १८ रोजी होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८ हजार ९७६ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. शहरातील २० केंंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडीकलकडे जाणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. मात्र या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत असतो.
यावर्षी १० मे रोजी सीईटीची परीक्षा होणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे तयारी करण्यात आलेली आहे. शहरातील २० केंद्रातील ३७४ वर्ग खोल्यांमध्ये ८ हजार ९७६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
तीन पेपर होणार
या परीक्षेंतर्गत गणिताचा पहिला पेपर सकाळी १० ते ११.३० यावेळेत होईल. त्यानंतर १२.३० ते २ यावेळेत फिजिक्स, केमेस्ट्रीचा पेपर होणार आहे. तर दुपारी ३ ते ४.३० यावेळेत बायोलॉजीचा पेपर होणार असल्याचे सांगण्यात आले.
६६४ कर्मचाºयांची नियुक्ती
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी २० उपकेंद्रप्रमुख, ४० सहायक उपकेंद्रप्रमुख, ११० शिपाई, ३९० समवेक्षक, ९८ पर्यवेक्षक, ३ समन्वय अधिकारी, ३ सहायक समन्वय अधिकारी अशा एकूण६६४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कर्मचाºयांचे प्रशिक्षण
या नियुक्त कर्मचाºयांचा दुसरा प्रशिक्षण वर्ग ९ मे रोजी सकाळी ८.३० वाजता ज्योती चित्र मंदिर, धुळे येथे होणार आहे.


 

Web Title: 9,000 students in Dhule district will not be given CET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.