बळसाणे येथे घरातून ९० हजारांचा अफू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:27 PM2020-08-31T22:27:24+5:302020-08-31T22:27:42+5:30
निजामपूर : पर्यावरणपुरक गणेशोत्सव
धुळे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथे एका शेतातील घरात छापा टाकून निजामपूर पोलिसांनी अफूसह ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़
साक्री तालुक्यातील बळसाणे शिवारात भगवान सुकलाल खांडेकर (३८, रा़ बळसाणे ता़ साक्र) यांच्या मालकीच्या शेतातील घरात निजामपूर पोलिसांनी रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास तपासणी केली़ तपासणी करीत असताना पोलिसांना घराच्या पहिल्या खोलीत अफू आढळून आला़ यात ४९ हजार ४५० किंमतीचे अफुची सुकलेले तुकडे असलेली एक पिवळी गोणी आढळून आली़ या गोणीची तपासणी केली असता सुमारे ५ हजार ६६ किलो वजनाचे अफुची बोंडाचे सुकलेले प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे तुकडे दिसून आले़ तसेच २५ हजार ३३० रुपये किंमतीचे अफुची बोंडाची ओलसर तुकडे, ५ हजार ९२४ रुपये किंमतीचे अफुच्य टरफलाची भूकटी असलेली प्लॅस्टिकची पांढरी पिशवी या पिशवीत १ हजार ४८१ किलो अफुच्या टरफलाची भुकटी ५ हजार ४०४ रुपये किंमतीचे २ हजार ७०२ किलो वजनाचे प्रत्येकी २ हजार रुपये किलो प्रमाणे एका मोठ्या आकाराच्या स्टीलच्या बंद डब्यात ठेवलेली खसखस, ४ हजार ५७० रुपये किंमतीची २ हजार २८५ किलो ग्रॅम वजनाचे प्रत्येकी २ हजार रुपये किलो प्रमाणे एका लहान आकाराच्या स्टिलच्या बंद डब्यात ठेवलेली खसखस असा एकूण ९० हजार ६७८ रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला़ याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आशिष कांगणे यांनी दिलेल्या माहितीवरुन भगवान सुकलाल खांडेकर (३८, रा़ बळसाणे ता़ साक्री) याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़