पिंपळनेरसह परिसरातील ९२ मजूर गुजरात राज्यातून पुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 01:15 PM2020-05-01T13:15:20+5:302020-05-01T13:21:55+5:30
होमक्वारंटाईन करून घरी पाठवले
पिंपळनेर- गुजरात राज्यातून ऊसतोडीसाठी गेलेले सह परिसरातील ९२ मजूर आज पाटील दाखल झाले आहेत या सर्व मजुरांची तपासणे ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य रुग्णालयाच्या माध्यमातून करून त्यांना होम क्वारंटाईचा शिका हातावर मारून त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरी पाठविण्यात आले.
साक्री तालुक्यातील गुजरात राज्यामध्ये ऊसतोडीसाठी गेलेले आदिवासी मजूर आता दररोज येऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी सायन साखर कारखान्याचे ९६ मजूर व त्यांच्यासोबत असलेले ३५ ते ४० लहान मुले-मुली असे दाखल झाले होते या सर्वांना होम क्वारंटाईचा हातावर शिक्का मारून त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले होते, आज त्याच सायन साखर कारखान्यातील ९८ मजुरांसह मुले पिंपळनेर सह परिसरातील गावांचे मजूर आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दाखल झाले आहेत, यात पिंपळनेर बोरबंद भिल वस्तीतील १६, काकासट भिल वस्तीतील २८, रोहन ता.साक्री ३४, शेलबारी ता.साक्री ८, रायकोट ६, सडगाव ता.धुळे ४ आदी गावांचे मजूर दाखल झाले आहेत, रोहन येथील ऊस तोड मजूर पहाटे ३ वाजता गाव बाहेर वाहनाने आणून सोडण्यात आले आज साक्री ग्रामसेवक एच डी सोनार यांनी सकाळी प्राथमिक रुग्णालयाचे डॉक्टर यांच्याकडून सदर मजुरांची तपासणी करून घेण्यात आली या मजुरांना ग्रामपंचायतीने जेवण, पिण्याचे पाणी देण्यात आले. तर इतर सर्व मजुरांची तपासणी ग्रामीण रुग्णालयात वैदयकीय डॉक्टरांच्यावतीने करण्यात आली, सर्वांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून सरपंच साहेबराव गांगुर्डे, उपसरपंच विजय गांगुर्डे, ग्रामविस्तार अधिकारी डी डी चौरे या सर्वांनी या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व मजूर हे सायन साखर कारखान्यातील असल्याचे पत्र त्यांच्या कडे होते. ऊसतोड मजुरांची संख्या वाढत असल्याने येथील वैद्यकीय डॉक्टरांचा कामाचा ताण वाढलेला आहे.