920 सिंचन विहिरी मंजूर

By Admin | Published: January 9, 2017 12:03 AM2017-01-09T00:03:45+5:302017-01-09T00:03:45+5:30

रोहयो अंतर्गत 920 सिंचन विहिरी मंजूर करून दिल्या आहेत, अशी माहिती खासदार डॉ. हीना गावीत यांनी दिली.

920 irrigation wells approved | 920 सिंचन विहिरी मंजूर

920 सिंचन विहिरी मंजूर

googlenewsNext

शिरपूर : तालुक्यातील अध्र्यापेक्षा अधिक परिसर पाण्याविना कोरडा आहे, त्यामुळे खैरखुटी येथे 40 लाख रुपये खर्चाचा साठवण बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. तसेच रोहयो अंतर्गत 920 सिंचन विहिरी मंजूर करून दिल्या आहेत, अशी माहिती खासदार डॉ. हीना गावीत यांनी दिली.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ़ हीना गावीत यांनी तालुक्यातील दुर्गम आदिवासी  भागात भेटी दिल्या. तसेच  खैरखुटी (जामन्यापाडा) येथे साठवण बंधा:यांचे जलपूजन केल़े त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, तालुका प्रभारी डॉ़ जितेंद्र ठाकूर, मिलिंद पाटील, वसंत पावरा, हेमराज राजपूत, पं़स़ सदस्य बालकिसन पावरा, उपअभियंता चौधरी, गोमतीबाई रेमाल पावरा, सरपंच दिलीप पावरा, सरपंच शिवदास भिल सरपंच सतीश वाणी, रोहिणी उपसरपंच बन्सीलाल वंजारी, शेमल्या सरपंच कैलास पावरा, आंबे उपसरपंच संदीप माळी व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होत़े
डॉ. हीना गावीत म्हणाल्या, लोकप्रतिनिधींकडून विकासकामांचे जे दावे केले जातात ते तथ्यहीन आहेत़ अध्र्यापेक्षा जास्त तालुका पाण्याने कोरडा आहे.  या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रंधे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: 920 irrigation wells approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.