पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने वृद्धाचा खून, १० संशयितांविरूद्ध निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल

By अतुल जोशी | Published: May 10, 2023 05:18 PM2023-05-10T17:18:23+5:302023-05-10T17:18:36+5:30

नानाभाऊ बाबू भिल असे मयत वृद्धाचे नाव आहे. नानाभाऊ भिल यांनी विसरवाडी पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध फिर्याद दिली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.

A case has been registered in Nizampur police against 10 suspects for the murder of an old man after filing a complaint at the police station | पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने वृद्धाचा खून, १० संशयितांविरूद्ध निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल

पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने वृद्धाचा खून, १० संशयितांविरूद्ध निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल

googlenewsNext

धुळे : पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याच्या कारणावरून रुदाणे (ता. शिंदखेडा) येथील एका ६२ वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील म्हसाळे शिवारात ७ मे रोजी घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिसात ९ मे रोजी १० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानाभाऊ बाबू भिल असे मयत वृद्धाचे नाव आहे. नानाभाऊ भिल यांनी विसरवाडी पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध फिर्याद दिली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. संशयित आरोपीने नानाभाऊ भिल यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. तर उर्वरित आरोपींनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारले. घटनेची माहिती मिळताच निजामपूरचे सहायक पोलिस निरीक्षक एच. एल. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी शानाभाऊ बाबू भिल (वय ५९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुदाणे (ता. शिंदखेडा) येथील १० जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: A case has been registered in Nizampur police against 10 suspects for the murder of an old man after filing a complaint at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.