कडेला चारी खोदून ठेवली, त्यात पडून दुचाकीस्वार ठार; बाभूळवाडी येथील घटना
By देवेंद्र पाठक | Published: December 11, 2023 04:41 PM2023-12-11T16:41:55+5:302023-12-11T16:42:24+5:30
नरेश झिपरू देसले (रा. बाभूळवाडी, ता. धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे.
धुळे : रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चारीने दुचाकीस्वाराचा बळी घेतल्याची दुर्घटना धुळे तालुक्यातील बाभूळवाडी येथे शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. नरेश झिपरू देसले (रा. बाभूळवाडी, ता. धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे.
एमएच १८-बीएन ९०१० क्रमांकाच्या दुचाकीने नरेश देसले हे बाभूळवाडी गावाहून धुळ्याकडे येण्यासाठी निघाले. शनिवारी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास बाभूळवाडी गावापासून साधारण १ किमी अंतरावर अग्नी देवता मंदिराच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला खोदलेले आहे. याठिकाणी देसले यांची दुचाकी घसरली. रात्रीच्या वेळेस घडलेल्या अचानक अपघातामुळे देसले हे दुचाकीसह दूरवर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची घटना लक्षात येताच त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यशवंत झिपरू पाटील (देसले) (रा. नटराज टाॅकीजमागे, धुळे) यांनी दिलेल्या माहितीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी पावणे चार वाजता अपघाताची नोंद करण्यात आली, घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.
रिलेशनशिप दरम्यान कपलने एकमेकांना गिफ्ट देणं फार कॉमन आहे. लव्ह एक्सपर्ट मानतात की, गिफ्ट नात्यांची गाठ आणखी मजबूत करतात. पण कधी एखादा बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला 400 बकऱ्या गिफ्ट देऊ शकतो? हे जरा अजब आहे. पण एका घटस्फोटीत बॉडी बिल्डरने दावा केला होता की, ती निरोगी राहण्यासाठी बकरीचं दूध पिते. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने तिला बकऱ्या गिफ्ट करण्याचं प्लानिंग केलं.