आईने केलेला नवस फेडण्यासाठी डॉक्टर दाम्पत्याची तीर्थस्थळी पायी भ्रमंती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 05:52 PM2023-05-15T17:52:47+5:302023-05-15T17:53:08+5:30
२०२० मध्ये द्वारकेहून पायी निघाले, गावोगावी करतात मुक्काम
हर्षद गांधी
निजामपूर (धुळे): नोकरी करीत असताना दाेन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. डॅाक्टरांनी शस्त्रक्रिया करूनही काहीच उपयोग होणार नाही असे सांगितले. पण शस्त्रक्रिया करा असा आईचा डॅाक्टरांकडे आईनं हट्ट केला. मुलासाठी आईचा सुरू असलेला हट्ट बघून डॅाक्टरही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले. इकडे आई मंदिरात गेली. देवाजवळ नवस केला मुलाची दृष्टी परत आल्यास तो धार्मिक स्थळी पदयात्रा करेल असे आईने सांगितले. ‘देव’ला देवही पावला. दृष्टी परत आली. आईने देवाजवळ केलेला नवस फेडण्यासाठी डॅाक्टर दाम्पत्य धार्मिक स्थळी पदयात्रा करीत आहे. ही कहाणी आहे शास्त्रज्ञ डॉ. देव उपाध्याय व त्यांची पत्नी डॉ. सरोज उपाध्याय यांची. उपाध्याय दाम्पत्य शनिवारी निजामपूरात आले असता, त्यांच्या पदयात्रेचा उलगडा झाला.
डॅा.देव उपाध्याय हे मूळचे द्वारकेचे रहिवासी. त्यांनी लंडन येथील ॲाक्स्फर्ड विद्यापीठातून एस्ट्राेनॅामित पीएचडी केलेली आहे. शिवाय जीवशास्त्रातही ते निष्णात आहे. तर त्यांची पत्नी डाॅ. सरोज यांनी लंडन येथूनच मानसशास्त्रात पीएचडी केलेली आहे.
अशी सुरू झाली पदयात्रा
पदयात्रेबाबत सांगतात डॅा. देव म्हणाले काही वर्षांपूर्वी अचानक दोन्ही डोळ्याची दृष्टी गेली. अनेक इलाज केले, पण उपयोग झाला नाही. एका डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करूनही काहीच उपयोग होणार नाही असे सांगितले. मात्र आईने डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया करण्याचा हट्ट धरला. अखेर पुत्रप्रेमापोटी आईच्या हट्टापुढे डॅाक्टरही शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले.
इकडे शस्त्रक्रिया सुरू असताना, डॉ. देवर यांची आई भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात गेली. माझ्या मुलाची दृष्टी परत आल्यास मुलगा हरिद्वार, रामेश्वरम, पंढरपूर आदी आईची प्रार्थना ऐकली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने, डॉ. देव हे पुन्हा जग बघू लागले. आईने केलेला नवस फेडण्यासाठी डॉ. देव उपाध्याय यांनी पदयात्रेचा निर्णय घेतला. मात्र पतीला एकटे सोडता येणार नाही म्हणून त्यांच्या पत्नी डॅा. सरोज उपाध्याय यांनीही पतीसोबतच पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला.
२०२०पासून डॉ. उपाध्याय दाम्पत्य पायी द्वारकेहून पदयात्रेला निघालेले आहेत. दररोज २० ते २५ किलोमीटर ते प्रवास करतात. हरिद्वार, रामेश्वरम, तिरूपती बालाजी, पंढरपूर आदी धार्मिक स्थळी भेट देऊन ते परत द्वारकेकडे निघालेले आहेत.