मद्यपीने हॉटेल चालकाच्या डोक्यात मारली बाटली

By अतुल जोशी | Published: November 29, 2023 04:59 PM2023-11-29T16:59:32+5:302023-11-29T17:00:34+5:30

आम्ही हॉटेल बंद करत आहोत, येथे बसू नको असे सांगितल्याचा राग आल्याने, संशयित आरोपीने हॉटेल चालकाच्या डोक्यात दारूची बाटली मारून दुखापत केली.

a man hit a hotel driver on the head with a bottle in dhule | मद्यपीने हॉटेल चालकाच्या डोक्यात मारली बाटली

मद्यपीने हॉटेल चालकाच्या डोक्यात मारली बाटली

धुळे : आम्ही हॉटेल बंद करत आहोत, येथे बसू नको असे सांगितल्याचा राग आल्याने, संशयित आरोपीने हॉटेल चालकाच्या डोक्यात दारूची बाटली मारून दुखापत केली. तसेच हॉटेल मध्येही तोडफोड केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नेर येथे घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेर येथील एक संशयित आरोपी हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये दारू पिऊन बसला होता. रात्र झाल्याने, हॉटेल चालकाने मद्दपीस तु माझ्या हॉटेलवर बसू नको, मी हॉटेल बंद करतो आहे असे सांगितले. याचा राग आल्याने, संशयिताने हॉटेल मधील टेबल-खुर्चांची मोडतोड करून नुकसान केले. तसेच टेबलावर पडलेली काचेची बाटली हॉटेल चालकाच्या डोक्यावर मारून दुखापत केली. 

याप्रकरणी हॉटेल चालक गोपाल सोमनाथ चौधरी (वय ३२, रा. कुसुंबा,ता. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस स्टेशनला संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक हर्षल धनगर करीत आहे.

Web Title: a man hit a hotel driver on the head with a bottle in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.