डोळ्यात मिरचीपूड टाकून जमावाची तरुणाला मारहाण

By देवेंद्र पाठक | Published: July 2, 2024 06:07 PM2024-07-02T18:07:46+5:302024-07-02T18:07:56+5:30

सोनगीर येथील घटना, कारण अस्पष्ट

A mob beat up a young man by putting chilli powder in his eyes | डोळ्यात मिरचीपूड टाकून जमावाची तरुणाला मारहाण

डोळ्यात मिरचीपूड टाकून जमावाची तरुणाला मारहाण

धुळे : येथील राजकुमार नगर येथील रहिवासी राजेश दिलीप चौधरी (वय ३०) या तरुणाला सात ते आठ अज्ञात इसमांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेश गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सोनगीर गावात घडली. दरम्यान मारहाण का आणि कोणी केली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

राजेश चौधरी हा तरुण बेथमुथा कंपनी कार्यरत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता तो घरातून बाहेर जात असताना त्याला कारमधून आलेल्या अज्ञात सात ते आठ लोकांनी अडविले. शिवीगाळ करत अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. यात लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. मारहाण करणाऱ्या सर्वांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यांनी सुरुवातीला राजेश चौधरी याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली व त्यांनतर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाणीनंतर सर्व संशयित आरोपींनी पळ काढला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून मारहाणीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, राजेश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे

Web Title: A mob beat up a young man by putting chilli powder in his eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.