खासगी बस उलटली; शिशूसह तीनजण ठार, चौगाव गावाजवळील घटनेत १९ प्रवासी जखमी
By अतुल जोशी | Published: April 3, 2024 04:52 PM2024-04-03T16:52:03+5:302024-04-03T16:53:19+5:30
राजस्थानातून हैद्राबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकासह तीनजण ठार तर १९ जण जखमी झाले.
अतुल जोशी,धुळे : राजस्थानातून हैद्राबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकासह तीनजण ठार तर १९ जण जखमी झाले. मृतात एका दीड महिन्याच्या शिशुचा समावेश आहे. हा अपघात चौगाव गावाजवळील खंडेराव बारीत बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाला.
अपघातात पूजा (वय ३२), तिचा दीड महिन्याचा शिशू व चालकाचा समावेश आहे. राजस्थानातून हैद्राबादच्या दिशेने खासगी बस (क्र.अेआर ११-बी ५८५१) जात होती. बसमध्ये ३० प्रवासी होते. बसचा वेग जास्त असल्याने, चालकाचे नियंत्रण सुटून बस धुळे तालुक्यातील चौगाव गावाजवळ रस्त्याच्या बाजुला उलटली.
या अपघातात गोविंदसिंग (१८), टोकसिंग (१८), रमेशकुमार (३२), भरतसिंग (४३), महेशकुमार (७), नीलेशकुमार (६), गुड्डीदेवी (३५), हॅपीसिंग (२२), महावीरकुमार (२२), सुरेशसिंग (२६), शुभम (८), सागवीचेतन (६), मोहलदेवी (६), मोतीसिंग (२१), हरीश तेवासी (१८), मनोहरसिंग (२०), प्रकाशसिंग (१८), अनुपसिंग (३०), जिताराम (२७) हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच १०८ रूग्णवाहिकेचे उपजिल्हा व्यवस्थापक जयेश पाटील घटनास्थळी पोहचले. १०८ रूग्णवाहिकेद्वारे त्यांना जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस घटनास्थळी पोहचले. अपघातामुळे कुसुंबा-मालेगाव रोडवर वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या साह्याने बस उचलण्यात आली. सायंकाळी उशीरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद झालेली नव्हती.