ब्रेक निकामी झालेला ट्रेलर बनला मृत्युदूत; ११ वाहनांना धडक, तीन विद्यार्थ्यांसह १० ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:38 AM2023-07-05T06:38:52+5:302023-07-05T06:39:07+5:30

मृतांमध्ये तीन विद्यार्थी व दोन महिलांसह ट्रेलरचालक, सहचालकाचा समावेश आहे.

A trailer with brake failure becomes the death knell; 11 vehicles hit, 10 killed including three students | ब्रेक निकामी झालेला ट्रेलर बनला मृत्युदूत; ११ वाहनांना धडक, तीन विद्यार्थ्यांसह १० ठार

ब्रेक निकामी झालेला ट्रेलर बनला मृत्युदूत; ११ वाहनांना धडक, तीन विद्यार्थ्यांसह १० ठार

googlenewsNext

-सुनील साळुंके 

शिरपूर (जि. धुळे) : समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच पळासनेर गावाजवळ १६ चाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाला. खडी वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने,  ११ वाहनांना धडक दिली तसेच बसस्थानकाला धडकत ट्रेलर एका हाॅटेलवर जाऊन आदळला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, २३ जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये तीन विद्यार्थी व दोन महिलांसह ट्रेलरचालक, सहचालकाचा समावेश आहे. हा अपघात मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर झाला. इंदूरकडून  शिरपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरमध्ये ४० टनापेक्षा जास्त खडी भरली होती. पळासनेर गावाजवळील हरियाणा हॉटेलसमोर एक ट्रकचालक टायर बदलत असताना त्यास  ट्रेलरने धडक देऊन एका दुचाकी गाडीला उडविले. त्यानंतर एका कारला जबर धडक दिली. त्यापाठोपाठ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकी, स्कूल बस आदी वाहनांना धडक देत बसस्थानक व हॉटेल तुडवत कंटेनर उलटला. कंटेनरमधील असलेली १६ टनांपेक्षा अधिक खडी रस्त्यावर व बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या शाळकरी, लोकांच्या अंगावर पडल्यामुळे ते काही क्षणांतच खडीत दबले गेले. 

पाच लाखांची मदत 
अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

मृतांची नावे
प्रतापसिंग भीमसिंग गिरासे (७०, रा. पळासनेर), गीता मुरी पावरा (१५, कोळशापाणी पाडा मोयदा-पळासनेर), मुरी सुरसिंग पावरा (२८, रा. कोळशापाणी), संजय जायमल पावरा (३८, रा. कोळशापाणी), रितेश संजय पावरा (१४, रा. कोळशापाणी), किरमा डेबरा कनोजे (१२, रा. आंबापाणी), सुनीता राजेश खंडेलवाल (५०, रा. देवपूर धुळे), कंटेनरचालक कन्हैयालाल बंजारा (५५, रा. जावदा, जि. भिलवाडा, चित्तोडगड), सहचालक सुरपालसिंग जवानसिंग राजपूत (५२, रा. जावदा, ता. निंबाहेडा), दशरथ पावरा (३५, रा. पळासनेर) 

Web Title: A trailer with brake failure becomes the death knell; 11 vehicles hit, 10 killed including three students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.