शेतातील झोपडीत जाऊन महिलेचा विनयभंग, शिरपूर तालुक्यातील घटना
By देवेंद्र पाठक | Published: February 20, 2024 05:44 PM2024-02-20T17:44:40+5:302024-02-20T17:44:52+5:30
शिरपूर तालुक्यातील एका गाव शिवारात शेती असून त्यात सालदारासाठी झोपडी तयार करण्यात आलेली आहे.
धुळे : घरात कोणीही नसल्याची संधी साधून एकाने स्वत: चे कपडे काढले. महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील एका गावशिवारातील झोपडीत सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात रात्री साडेदहा वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
शिरपूर तालुक्यातील एका गाव शिवारात शेती असून त्यात सालदारासाठी झोपडी तयार करण्यात आलेली आहे. घरातील सदस्य आपापल्या कामासाठी गेल्यानंतर घरातील महिला एकटीच होती. ही संधी साधून सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एकाने स्वत:वे अंगावरचे कपडे काढून घरात विनापरवानगी प्रवेश केला. महिलेची साडी आणि ब्लाऊज फाडले.
महिलेचा विनयभंग केला. तिने आरडा ओरड केल्याने तो इसम पळून गेला. स्वत: ला सावरत तिने घरातील सदस्यांना बोलावून घेतले. घडलेला प्रकार सांगत थाळनेर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांसमोर आपबीती कथन केली. याप्रकरणी सोमवारी रात्री साडेदहा वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गावातीलच एकाविरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ (ब), ४५२, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार घटनेचा तपास करीत आहेत.