बोरी नदीत बुडून निमगुळ येथील तरुणाचा मृत्यू
By देवेश फडके | Published: August 12, 2022 10:56 PM2022-08-12T22:56:37+5:302022-08-12T22:57:03+5:30
धुळे तालुक्यातील बोरी नदीच्या काठावरून पायी घराकडे जात असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. नदीला बऱ्यापैकी पूर असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील निमगुळ भागात दुपारी घडली.
- देवेंद्र पाठक
धुळे : तालुक्यातील बोरी नदीच्या काठावरून पायी घराकडे जात असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. नदीला बऱ्यापैकी पूर असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील निमगुळ भागात दुपारी घडली. शांताराम प्रकाश मोरे असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.
धुळे तालुक्यातील निमगुळ शिवारातून बोरी नदी वाहते. गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात आणि मालेगाव परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे बोरी नदीला पूर आला आहे. नदी ही दुथडी भरून वाहत आहे. नदीत वाळूउपशामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे पुराच्या पाण्याचे भरले आहेत. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास निमगुळ गावाजवळ नदीपात्राला लागून असलेल्या रस्त्यावरून गावातील शांताराम प्रकाश मोरे (२६) हा बाहेर काढले. त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डाॅ. सूरज पावरा यांनी तपासून सायंकाळी मृत घोषित केले.
याप्रकरणी राजेंद्र देवीदास माेरे (रा. निमगुळ, ता. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुण शांताराम मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. तरुण शांताराम यांच्या मृत्यूवर ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.