मारण्याची सुपारी दिल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण; धुळ्यातील घटना

By देवेंद्र पाठक | Published: April 25, 2023 07:02 PM2023-04-25T19:02:47+5:302023-04-25T19:02:52+5:30

सत्तार मेंटलसह पाच जणांविरोधात गुन्हा

A youth was beaten up on suspicion of giving betel nuts; Incidents in the dust | मारण्याची सुपारी दिल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण; धुळ्यातील घटना

मारण्याची सुपारी दिल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण; धुळ्यातील घटना

googlenewsNext

धुळे : जीवे ठार मारण्याची सुपारी दिली आहे, असा संशय आल्याने सत्तार मेंटल (वय ४९) आणि त्याच्या अन्य चार साथीदाराने तरुणावर जीवघेणा हल्ला केला. यात तरुणासह त्याचे सहकारी जखमी झाले. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहरातील अंबिका नगरात सोमवारी दोन गटात हाणामारीची घटना घडली.

याप्रकरणी अजीम शमशुद्दीन शेख (वय २३, रा. दिलदारनगर, धुळे) याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंबिका नगरातील सना हायस्कूल येथे तरुणाला बोलाविण्यात आले. तेथे त्याच्या सोबत मित्रही होते. त्यावेळी तुमने हमको जानसे मारने की सुपारी दी है... असे म्हणत सत्तार मेंटल आणि त्याच्या अन्य साथीदारांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला जाऊन अजीमवर सत्तारने लोखंडी पाईपने हल्ला केला. तसेच त्याच्या मित्रांनाही मारहाण केली. या हल्ल्यात अजीम हा जखमी झाला. या घटनेनंतर मारेकऱ्यांनी पळ काढला.

जखमी अवस्थेत अजीम याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर अजीम याने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सत्तार मेंटल (वय ४९) याच्यासह त्याच्या अन्य चार साथीदारांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक संदीप ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: A youth was beaten up on suspicion of giving betel nuts; Incidents in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.