साक्री येथे उद्या धडकणार ‘आसूड यात्रा’
By admin | Published: April 18, 2017 10:20 PM2017-04-18T22:20:37+5:302017-04-18T22:20:37+5:30
विधवा महिला, अपंग बंधू व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १९ रोजी साक्री शहरात आसूड यात्रेचे आगमन होत आहे.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 18 - विधवा महिला, अपंग बंधू व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १९ रोजी साक्री शहरात आसूड यात्रेचे आगमन होत आहे.
आमदार बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्त्वात आसूड आंदोलन केले जात आहे. साक्री शहरात दुपारी तीन वाजता आसूड यात्रेचे आगमन होणार आहे. त्यानंतर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरात दुपारी तीन वाजता मेळावा होणार आहे. यानंतर ही यात्रा तालुक्यातील बळसाणे येथे जाणार आहे. तेथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितीचे आवाहन बळसाणे येथील अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय संस्था व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.