सणाच्या पार्श्वभूमिवर शिक्षकांचे वेतन लवकर करा, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सीईओंकडे मागणी

By अतुल जोशी | Published: April 4, 2023 03:30 PM2023-04-04T15:30:54+5:302023-04-04T15:33:40+5:30

 सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन संघटनेला देण्यात आले.

accelerate teachers pay progressive primary teachers union demands to ceo amid festive backdrop | सणाच्या पार्श्वभूमिवर शिक्षकांचे वेतन लवकर करा, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सीईओंकडे मागणी

सणाच्या पार्श्वभूमिवर शिक्षकांचे वेतन लवकर करा, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सीईओंकडे मागणी

googlenewsNext

धुळे-स्मार्ट अपडेशन ॲपवरील विद्यार्थ्यांची ॲानलाइन हजेरी १५ एप्रिलपर्यंत करऱ्यात यावी. तसेच एप्रिल महिन्यात येणारे सण लक्षात घेऊन शिक्षकांचे पगार लवकर करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., व उपशिक्षणाधिकारी मनीष पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,   स्मार्ट अटेन्डश वरील विद्यार्थ्यांची ॲानलाइन  हजेरी पंधरा एप्रिल पर्यंत करण्यात यावी. कारण २२ एप्रिल रोजी अक्षय तृतीया असल्याने खान्देश मधील महिला माहेरी जातात. त्यांच्याबरोबर मुलंही जातात. तसेच ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, खाजगी प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद शाळेची परीक्षा  १५एप्रिल पर्यंत संपलेली असते. व त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थितीचे प्रमाण कमी झाले असते. म्हणून स्मार्ट अटेन्डश वरील विद्यार्थ्यांची आॅनलाईन हजेरी १५ एप्रिल पर्यंत करावी.  

तसेच एप्रिल महिन्यात डाॅं.बाबासाहेब आंबेडकर जयंती,अक्षय तृतीया, रमजान ईद आदी पवित्र सण येत असल्याने शिक्षकांचे वेतन लवकर करण्यात यावेत.पदोन्नती मुख्याध्यापक व विषय शिक्षक यांच्या मे अखेर रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांची भरती करण्यात यावी. पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षक यांच्या सेवा ज्येष्ठता यादीतील त्रुटींची दुरुस्ती करून अद्यावत यादी लवकर प्रसिद्ध करण्यात यावी.  जर संपकाळातील वेतन कपातीबाबत राज्य शासनाकडून काही निर्णय आलाआणि वेतन कपातीची वेळ आली तर या महिन्याच्या वेतनातून कपात करु नये.  सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन संघटनेला देण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: accelerate teachers pay progressive primary teachers union demands to ceo amid festive backdrop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे