धुळ्यात लाच स्वीकारतांना जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ लिपीक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:31 PM2018-01-22T14:31:28+5:302018-01-22T14:32:51+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

Accepting a bribe in Dhule, a senior surgeon of the district hospital has been arrested | धुळ्यात लाच स्वीकारतांना जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ लिपीक जाळ्यात

धुळ्यात लाच स्वीकारतांना जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ लिपीक जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयिताने पाच हजार रूपयांची केली होती मागणीसापळा रचून पथकाने केली कारवाईगुन्हा दाखल करण्याचे काम सुरू


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वेतनवाढीचा फरक व मागील पगार काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ लिपीक सुरेश वना सैंदाणे (५२, रा. धुळे) यास सोमवारी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी केली.
ेलाचप्रकरणी धुळ्यातील शासकीय कर्मचाºयाला पकडण्याची चार दिवसातील ही दुसरी घटना आहे.  
तक्रारदाराचा  वेतनवाढीचा फरक व मागील पगार बाकी होता. तो काढून देण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ लिपीक सुरेश सैंदाणे याने पाच हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या अधिकाºयांनी जुन्या जिल्हा रूग्णालयाच्या आवारात सोमवारी सकाळी सापळा रचला होता.
तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारतांना सैंदाणे यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
चार दिवसातील दुसरी कारवाई
 शेतजमिनीचा मोबदला देण्यासाठी लाचेची मागणी करणाºया जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचखोर शिपाई राजेंद्र बैसाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ जानेवारीला पकडले होते. लाच प्रकरणी धुळ्यात चार दिवसाच्या कालावधीत ही दुसरी कारवाई आहे.  


 

Web Title: Accepting a bribe in Dhule, a senior surgeon of the district hospital has been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.