सरवड फाट्यावर अपघात, ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 06:42 PM2018-10-23T18:42:59+5:302018-10-23T18:46:21+5:30

ट्रक-दुचाकीची धडक : नंदाणे, बुरझडसह लोणपिंप्रीत हळहळ

Accident on Saurav fate, 3 killed | सरवड फाट्यावर अपघात, ३ ठार

सरवड फाट्यावर अपघात, ३ ठार

Next
ठळक मुद्देधुळे तालुक्यातील सरवड फाट्याजवळील घटनाट्रक आणि दुचाकी अपघातात १ जागेवर तर २ रुग्णालयात झाले मृत

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे/सोनगीर : तालुक्यातील सरवड फाट्याजवळ सोनगीरकडून धुळ्याकडे जाणाºया ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी घडली़ यात एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला़ अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती़ 
या अपघातात सुनील नानाभाऊ पाटील (२८, रा़ नंदाणे ता़ धुळे), हेमंत रामेश्वर पाटील (१८, रा़ बुरझड ता़ धुळे) आणि भुरा जगन निकम (२९, रा़ लोणपिंप्री ता़ चाळीसगाव जि़ जळगाव) असे या मृत झालेल्या तिघांची नावे आहेत़ 
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सरवड गावाच्या फाट्याजवळील गतिरोधकाजवळ सोनगीरकडून धुळ्याकडे येणारा ट्रक आणि दुचाकी यांच्यात  दुपारी दोन वाजेच्या सुमारास अपघात झाला़ या अपघातात दुचाकीवरील तिघे फेकले गेले़ त्यात त्यांना जबर दुखापत झाली़ दुचाकीवर बसलेल्या तिघांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालेला होता़ त्याच्यासह अन्य दोघा जखमींना तातडीने गंभीर अवस्थेत सोनगीर टोल प्लाझाच्या  रुग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़ जखमींपैकी भुरा जगन निकम याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तेथे त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला़ या अपघातात तिघेही ठार झाले आहेत़ ठार झालेल्या पैकी सुनील पाटील हे विवाहित असून हेमंत पाटील आणि भुरा निकम हे अविवाहित आहेत़ 
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी घटनास्थळ गाठले़ वाहतूक सुरळीत करत असताना अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे़ गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते़ 

Web Title: Accident on Saurav fate, 3 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.