साक्रीनजिक विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, बाप-लेकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:22 PM2018-10-27T16:22:51+5:302018-10-27T16:23:48+5:30

सुरत-नागपूर महामार्ग : दिवाळीच्या सुट्या लागल्याने घरी येताना घडली घटना

Accident of Schnarkanic students, accident of father-girl | साक्रीनजिक विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, बाप-लेकीचा मृत्यू

साक्रीनजिक विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, बाप-लेकीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील छडवेल पखरुणजवळील दुर्घटनावडिलांसह मुलीचा दुर्देवी अंत तर अन्य विद्यार्थी व पालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : सुरत नागपुर महामार्गावर छडवेल पखरूण गावाजवळ दुपारी दीड वाजेच्या सुमारास शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात होऊन एका विद्यार्थिनीसह वाहनाचा चालकाचा जागीच मृत्यू झाला़ या घटनेनंतर मदतकार्य वेगाने सुरु झाले़ घटनेबद्दल हळहळ व्यक्त झाली़ या अपघातात चालक संदीप गावित व त्यांची मुलगी दिपाली गावित हे दोनच जण मरण पावले आहेत़ बाकी जखमी आहेत़ 
सर्व विद्यार्थी मालेगाव तालुक्यातील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमधील आहेत़ साक्री तालुक्यातील आदिवासी भागात राहणारे हे विद्यार्थी होते़ या अपघातात दिपाली संदिप गावित (१३, रा़ पिंजारझाडी)  आणि संदीप ब्रिजलाल गावित (चालक) हे जागीच मरण पावले आहेत़ या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़
तर इतर जखमींवर साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ अपघातातील गंभीर जखमींमध्ये दिलबर एकनाथ चौरे (वय १०, रा़ पाचमौली) हिरालाल ब्रह्मा चौरे (रा़ पाचमौली) राजेंद्र भगवान पवार (वय ३५, रा़ मावचीपाडा) यांचा समावेश आहे तर इतर जखमींमध्ये करीना मनोहर कांबळे (वय १३ रा़ रायतेल) दीक्षांत भरत गावित (वय १०, रा़ पिंजारझाडी) मृणाल कन्हैयालाल भोये, भारती भीमराव बागुल (वय १३, रा़ गुलतारे) कन्हैयालाल तुळशीराम भोये (वय ३०, रा़ जामखेल), भरत आत्माराम गावित (वय ५०, रा़ पिंजारझाडी) या सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ़ भरत गोहील व डॉ़ भदाणे व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाºयांनी जखमींवर उपचार केले आहेत़
यासोबत साक्री शहरातील तरुणांनी रुग्णालयात येऊन जखमींची मदत केली़ हे सर्व विद्यार्थी आदिवासी विकास विभागामार्फत मालेगाव तालुक्यातील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल येथे त्यांचे अ‍ॅडमिशन झाले होत़े  हे सर्व विद्यार्थी दिपावळीच्या सुट्या लागल्याने आपल्या घरी जात होते़ यावेळेस या विद्यार्थ्यांच्या सोबत काही पालकही होते़ पालकांनी गावातीलच एमएच १८ डब्ल्यू ६६५३ क्रमांकाचे वाहन भाडे तत्वावर करुन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेवर गेले होते़ तेथून परत येत असताना छडवेल पखरून जवळ समोरून येणाºया वाहनाने गाडीला हुलकावणी दिल्याने विद्यार्थ्यांचे वाहन पलटी झाले़ 

Web Title: Accident of Schnarkanic students, accident of father-girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.