'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By अतुल जोशी | Published: September 21, 2022 05:02 PM2022-09-21T17:02:37+5:302022-09-21T17:03:41+5:30

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निवीर' सैन्य भरतीसाठी वडजाई येथील ३० तरुण मंगळवारी चाळीसगाव व तेथून मुंबईला रेल्वेने गेले.

Accidental death of a young man going for 'Agniveer' recruitment dhule | 'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

Next

धुळे : 'अग्निवीर'च्या भरतीसाठी मुंबईत जाणाऱ्या वडजाई येथील तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कल्याण स्थानकावर घडली. रामेश्वर भरत देवरे (२०, रा. वडजाई) असे मयत तरुणाचे नाव आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निवीर' सैन्य भरतीसाठी वडजाई येथील ३० तरुण मंगळवारी चाळीसगाव व तेथून मुंबईला रेल्वेने गेले. बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हे सर्वजण कल्याण येथे पोहोचले. तेथून हे तरुण मुंब्रा येथे 'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणार होते. मात्र, रामेश्वर भरत देवरे (२०) याला मळमळ होऊ लागल्याने, तो उलटी करण्यासाठी रेल्वे रुळाकडे गेला. वाकून उलटी करीत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या प्रवासी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वरचा अपघाती मृत्यू झाल्याने, मित्रही घाबरले होते.

रामेश्वर देवरे याचा कॉम्प्युटर डिप्लोमा झाला होता. रिकाम्या वेळेत तो वडिलांना शेतातील कामासाठी मदत करायचा. शेतात पिकविलेला भाजीपाला स्वतः विक्री करून तो आई-वडिलांना मदत करीत होता. नोकरीच्या अपेक्षेने दिवस-रात्र मेहनतही करीत होता. त्याच्या मेहनतीला फळ मिळेल, असे वडील सांगत असल्यामुळे त्याने सैन्यात जाण्याची तयारी केली होती. मात्र, देशसेवा करण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तो वडजाईचे उपसरपंच संजय महाराज देवरे यांचा पुतण्या होता.

Web Title: Accidental death of a young man going for 'Agniveer' recruitment dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.