शहादा-शिरपूर रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले

By admin | Published: February 8, 2017 11:53 PM2017-02-08T23:53:43+5:302017-02-08T23:53:43+5:30

वाहतूक समस्या गंभीर : वर्षभरात गमावले 15 जणांनी प्राण

Accidents on the Shahada-Shirpur road increased | शहादा-शिरपूर रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले

शहादा-शिरपूर रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले

Next

शहादा : शहादा ते शिरपूर या प्रमुख रस्त्यावर लहान-मोठय़ासह जड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यावर अपघातांचे प्रमाणात वाढ झाली आह़े
या रस्त्यावर वर्षभरात सुमारे पंधरा लोकांना आपला जीव गमवावा लागला आह़े तसेच अनेकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आह़े अवजड वाहनांमुळे रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुर्दशा झाली असल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप करण्यात येत आह़े अंकलेश्वर ते बु:हाणपूर हा प्रमुख राज्य मार्ग आह़े तसेच गुजरात जाण्यासाठी व येण्यासाठी अंकलेश्वर, अक्कलकुवा, खापर, शहादा, शिरपूरमार्गे ब:हानपूर व मध्यप्रदेश राज्यात जाण्यासाठी सोयीचा मार्ग आह़े या मार्गावर दररोज लहान-मोठी तसेच अवजड वाहनांची वाहतूक होत असत़े त्यामुळे रस्त्याची स्थिती खिळखिळी झाली आह़े सोनगड, व्याहरा, नवापूरमार्ग धुळेकडे जाण्यापेक्षा अवजड वाहतूकदार शहादा मार्गे जाण्यास पसंती देत आहेत़ प्रमुख राज्य मार्गाचे सव्रेक्षण होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला गेला आह़े परंतु अजूनदेखील कामाला शुभारंभ होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
तसेच रस्त्याच्या लगत मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्याने प्रवाशांना याचा अधिकच त्रास होत आह़े दरम्यान रात्रीच्या वेळी अवजड वाहनचालक आपला मनमानी कारभार करीत असल्याचे सांगण्यात येत आह़े दुचाकीचालकांना ओव्हर टेक करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप दुचाकीचालकांकडून करण्यात येत आह़े त्यामुळे याकडे वाहतूक शाखेने लक्ष द्यावे अशी मागणी होत आह़े
    (वार्ताहर)

शहादा ते अनरद बारी दरम्यान वाहतूक वर्दळ मोठय़ा प्रमाणात आह़े हा रस्ता अरुंद असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आह़े गेल्या काही वर्षात याच ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत़ रस्ता अरुंद आहेत पण  त्यातच रस्त्याच्या लगत साईड पट्टय़ा खोल असल्याने यामुळे प्रवाशांना अधिक त्रास होत आह़े रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक छोटे-मोठे अपघात नित्याचेच आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आह़े

Web Title: Accidents on the Shahada-Shirpur road increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.