महिलेला मारहाणप्रकरणी आरोपींना अटक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:27 PM2019-12-30T22:27:46+5:302019-12-30T22:28:51+5:30

साक्री : गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

The accused should be arrested for beating the woman | महिलेला मारहाणप्रकरणी आरोपींना अटक व्हावी

Dhule

Next

साक्री : तालुक्यातील म्हसदी येथील वंदना देवरे यांना मारहाण करणाऱ्या व या घटनेमध्ये सामील असलेल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
म्हसदी येथील रहिवाशी व नोकरीनिमित्त ठाणे येथे स्थायिक झालेल्या वंदना देवरे आपल्या नातेवाईकांच्या विवाहानिमित्त म्हसदी येथे आल्या होत्या. त्यावेळेस त्यांना गावातील आदिवासी महिला व पुरुषांनी बेदम मारहाण केली होती व मारहाण करत ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन गेले होते. या घटनेमागे गावातील काही प्रतिष्ठित लोकांचा हात असल्याचा आरोप सदर महिला व त्यांच्या पतीने केला होता व त्यांच्या विरोधात साक्री पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील फक्त दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर इतर फरार झाले आहे. यामध्ये म्हसदी येथील शाळेतील शिक्षकांचा समावेश असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. परंतु आरोपींना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असून फरार आरोपींना लवकरच जेरबंद करावे, अशी मागणी वंदना देवरे, सायली देवरे व इतर महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
शिंदे यांनी पोलिसांना सूचना देऊन या घटनेत जेवढे आरोपी सामील आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रीकरण पाहून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Web Title: The accused should be arrested for beating the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे