धुळ्यातील कारागृहात जागविल्यात आचार्य विनोबाजींच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 09:38 PM2019-09-13T21:38:00+5:302019-09-13T21:38:08+5:30
१२५ वी जन्मशताब्दी: साºया बंदीवानाच्या डोळ्यात तरळले अश्रू
धुळे : भारतरत्न, भुदान चळवळीचे राष्ट्रीय संत आचार्य विनोबाजी भावे यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीनिमित्त धुळ्यातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आजच्या पिढीला माहिती नसललेल्या जुन्या व दुर्मिळ आठवणी साम्ययोग मासिकाचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार रमेश दाणे यांनी आपल्या मनोगतातून सांगण्याचा प्रयत्न केला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृहाच्या अधिक्षिका दिपा आगे या होत्या़
दाणे यांनी १९३२ मधील धुळे कारागृहातील प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा नुकतेच जमनालाल बजाज यांनी प्रकाशित केलेले विनोबा भावेंचा ‘गिताई’ हा ग्रंथ देशभरात पोहचला होता़ येथील कारागृहातही त्याच्या प्रती आलेल्या होत्या़ त्याचे लिखाण साने गुरुजी करीत होते़ प्रवचनाचा शेवटचा दिवस होता़ तेव्हा साºया कैद्यांनी तुरुंग अधिकाºयांकडे दोन आणे मागितले़ ते त्यांच्या भत्त्यातून आणि आम्ही सारे कैदी एकवेळेचे जेवण घेणार नाही, या अटीतूऩ इंग्रजी अधिकाºयाने विचारले की या दोन आण्याचे तुम्ही काय कराल? त्यावेळेस सारे कैदी म्हणाले होते, की आम्ही एका आण्याचे गिताई पुस्तक घेऊ आणि एक आणा विनोबाजींच्या भूदानसारख्या राष्ट्रीय विधायक कार्यासाठी देवू़ हे वाक्य ऐकताच त्यावेळेस असलेल्या कारागृहातील बंदिवानांनी उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजविल्या़ अध्यक्षीय भाषणात दिपा आगे यांनी विनोबाजींच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला़ याप्रसंगी माजी नगरसेवक कैलास चौधरी, दलित मित्र मधुकर शिरसाठ, मालती शिरसाठ, सुनील देवरे, जितेंद्र शाह, प्रा़ महेश भालेराव, अशोक गाळणकर, कारागृह आहार निरीक्षक रंजना नेवे, जगदीश देवपूरकर, तुरुंग अधिकारी एऩ एच़ कन्नेवाड, नेहा गुजराथी आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत पोतदार यांनी केले़ बंदिवान स्त्री-पुरुष उपस्थित होते़
कारागृहात गितांचा कार्यक्रम
माजी नगरसेवक कैलास चौधरी यांच्या सौजन्याने विनोबाजींच्या जयंतीनिमित्त भक्तीगिते आणि राष्ट्रभक्तीपर गितांचा कार्यक्रम पार पडला़ अकबर शाह - अरीफ मुजावर, राजेश खलाने, युवराज निकुंभे या कलावंतांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला़ फुलो का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, या गिताला तर साºया बंदिवान भगिनीच्या डोळ्यात अश्रू तराळले होते़