ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित

By अतुल जोशी | Published: January 25, 2024 05:27 PM2024-01-25T17:27:54+5:302024-01-25T17:28:07+5:30

उन्हाळा सुरू होण्यास जवळपास एक महिना बाकी आहे, तोच अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागलेली आहे.

Acquired wells for 26 villages in dhule district this winter | ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित

ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित

अतुल  जोशी,धुळे : उन्हाळा सुरू होण्यास जवळपास एक महिना बाकी आहे, तोच अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागलेली आहे. शिंदखेडा तालुक्यातील एका गावात टँकरने पाणीपुरवठा होऊ लागला आहे, तर जिल्ह्यातील २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित करण्यात आलेली आहे. आताच अशी परिस्थिती असल्याने, उन्हाळ्यात टँकरसह विहीर अधिग्रहणाचा आकडाही फुगणार, हे स्पष्ट आहेे. धुळे जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही, तसेच विहिरींच्या जलपातळीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत विहिरींनी तळ गाठलेला आहे.

ऐन हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यातील डाबली गावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात आलेला आहे, तर जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी २६ विहिरी अधिग्रहित केेलेल्या असून, त्यात धुळे तालुक्यात २, साक्री तालुक्यात २ व शिंदखेडा तालुक्यातील २२ गावांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली आहे.

Web Title: Acquired wells for 26 villages in dhule district this winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.