पाच महिन्यात १५४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:03 PM2017-09-17T16:03:32+5:302017-09-17T16:04:21+5:30

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सर्रास सुरूच : महसूल विभागातर्फे २८ लाखांची दंडात्मक वसुली

Action on 154 vehicles in five months | पाच महिन्यात १५४ वाहनांवर कारवाई

पाच महिन्यात १५४ वाहनांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे धुळे ग्रामीणमधून सर्वांधिक वाहने जप्त गेल्या चार महिन्यात धुळे ग्रामीणमधून अवैध गौण खनिजाची चोरी करणारे सर्वाधिक ३५ वाहने जप्त करण्यात आली आहे. संबंधितांकडून ७ लाख ५ हजार ८० रुपयांचा दंड वसूल केला आहे.तर पिंपळनेर व दोंडाईचा अपर तहसील कार्यालयांतर्गत अनुक्रमे ११ वाहने पकडल्याची माहिती गौण खनिज विभागातर्फे देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अवैध वाळू किंवा इतर गौण खनिजची चोरी करणाºयांच्या विरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या पाच महिन्यात महसूल विभागाने जिल्हाभरात केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणारी १५४ वाहनांवर कारवाई केली असून संबंधितांकडून २८ लाख ३५ हजार ११९ रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. 
शनिवारी पहाटे धुळे तालुक्यातील नगावगावाजवळ अपर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर, डंपरवर कारवाई केली होती. महसूल विभागातर्फेही अवैध वाळू उपसा करणाºयांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली असली तरीही जिल्ह्यात अजुनही सर्रास अवैध वाळू किंवा गौण खनिजाची चोरी सुरू असल्याचे दिसून येते. 
कारवाईत सातत्य नाही 
महसूल विभागातर्फे कारवाईत सातत्य राहत नसल्यामुळे  अवैध वाळू उपसा करणाºयांची मुजोरी वाढली आहे. त्यानुसार वाळू उपसा बंद असतानाही नियमांचे उल्लंघन करून वाळू चोरी होण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. 
वाळू उपसा बंद 
गेल्यावर्षी शिंदखेडा तालुक्यातील हिसपूर व वरली, शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड, सावळदे व खर्दे-खुर्द या गावातील नदी पात्रात वाळू  उपसा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठेका दिला होता. त्याची मुदत आता संपल्यामुळे आता या घाटातून वाळू उपसा बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
नोव्हेंबरमध्ये निघणार नवीन निविदा
वाळू उपसा करण्यासाठी ठेकेदारांना ठेका देण्यासाठी नव्याने निविदा नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. तत्पूर्वी, गौण खजिन विभागाने जिल्हाभरातील वाळू उपसा करण्यासाठी केलेले सर्वेक्षण व जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींकडून आलेले वाळू उपसा संदर्भातील ठरावाचा प्रस्तावाचा अहवाल तयार करून तो  विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया पार पडेल, असे सूत्रांनी सांगितले आहे. 

Web Title: Action on 154 vehicles in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.