नंदुरबार जिल्ह्यात 14 महिन्यात 16 लाचखोरांवर कारवाई
By Admin | Published: May 23, 2017 05:17 PM2017-05-23T17:17:18+5:302017-05-23T17:17:18+5:30
महिन्याला येतात पाच तक्रारी. पाच वर्षात मात्र एकच सेवेतून बडतर्फ
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.23- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मार्च 2016 पासून तब्बल 16 लाचखोरांवर कारवाई केली आह़े शासकीय कामकाज करताना पैश्यांची मागणी करणा:यांची यादी मात्र वाढतच आह़े
गेल्या पाच वर्षात सामान्याकडे लाचेची मागणी करणा:यांवर कारवाईचा धडाका लावणा:या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने जिल्ह्याच्या विविध भागात केलेली जनजागृती आणि अपसंपदाधारकांची ठेवलेली माहिती यामुळे त्यांच्या कारवाईचा वेग वाढला आह़े विभागाने टोल फ्री क्रमांक आणि इतर अनेक गोष्टींबाबत जागरूकता निर्माण केल्याने नागरिकांचा संपर्क वाढत आह़े विभागाकडे जिल्हाभरातून देण्यात येणा:या विविध तक्रारींची पडताळणी करून कारवाई केली जात आह़े
नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मार्च 2016 ते मे 2017 या काळात 16 लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आह़े यात मार्च 2016 मध्ये 1, एप्रिल 2, जून 2, जुलै 1, ऑक्टोबर 2,नोव्हेंबर 1, जानेवारी 2017 मध्ये 3, एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी एक अशा 16 कारवाया करण्यात आल्या आहेत़ यातील तीन जणांवर पदाचा दुरूपयोग करून शासकीय कामासाठी पैशांची मागणी करणारे तर उर्वरित 13 प्रकरणे ही पिडीत व्यक्तीने लाच मागणा:याविरोधात तक्रार दिल्यानंतर कारवाई केल्याची होती़
गेल्या पाच वर्षात दरवर्षाला साधारण 10 लाचखोरांवर संबधित विभाग कारवाई करत आह़े न्यायालयीन कारवाईनंतर त्यातील ब:याच जणांना जामिन मंजूर झाले आहेत़ यात केवळ 2015 मध्ये एकास न्यायालयाने लाच घेतल्याचे दोषी मानून शिक्षा दिली आह़े संबधित शासकीय कर्मचा:यास सेवेतून बडतर्फे करण्यात आली आहेत़ सद्धस्थितीत सर्व 16 प्रकरणांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आह़े