धुळे जिल्ह्यात दहा महिन्यात ३११ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:37 PM2018-02-23T15:37:32+5:302018-02-23T15:39:01+5:30

गौण खनिज विभागाची ५१ टक्के वसुली : अवैध वाळू उपसा करणाºयांवर १ कोटींची दंडात्मक कारवाई

Action for 311 vehicles in Dhule district in 10 months | धुळे जिल्ह्यात दहा महिन्यात ३११ वाहनांवर कारवाई

धुळे जिल्ह्यात दहा महिन्यात ३११ वाहनांवर कारवाई

Next
ठळक मुद्देएप्रिल २०१७ ते मार्च २०१८ याकालावधित गौण खनिज विभागाला वसुलीसाठी ३६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. जानेवारी अखेरपर्यंत १८ कोटी ६० लाख ४७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. आतापर्यंत ५१.६८ टक्के वसुली झाली असून मार्च अखेर पर्यंत गौण खनिज विभागाला प्राप्त असलेले उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. गेल्यावर्षी गौण खनिज विभागाला ३३ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या विभागाने गेल्यावर्षभरात २५ कोटी ७५ लाख ९१ हजार वसुली करण्यात या विभागाला यश मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्याच्या कालावधीत अवैध वाळू व गौण खनिज उपसा करणाºया ३११ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून १ कोटी ४० लाख ८० हजार १३९   रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, गौण खनिज विभागाने यावर्षी प्राप्त उद्दिष्टापैकी जानेवारी अखेरपर्यंत ५१ टक्के वसुली केल्याची माहिती समोर आली आहे. 
अवैध गौण खनिज किंवा वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा तालुकानिहाय पथकांची नियुक्ती केली होती. परंतु, या पथकांचा वाळू माफियांवर ‘वचक’च निर्माण होत नसल्याने जिल्ह्यात सर्रास वाळू व इतर गौण खनिज उपसा क रण्याचे प्रकार सुरू आहे. विशेषत: या पथकांनी कारवाई करूनही हे प्रकार थांबत नसल्याची बाब आता समोर आली आहे. 
प्रांताधिका-यांनी पकडली सर्वाधिक वाहने
वाळू माफियांना चाप बसावा; याउद्देशाने तहसीलदार व प्रांताधिकाºयांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या पथकातील सदस्यांना मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यात एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१८ या कालावधित सर्वाधिक १८५ वाहने ही प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी पकडली. तर शिरपूरच्या प्रांताधिकारी नितीन गावंडे यांनी १२६ वाहने पकडली.  धुळे अपर तहसील कार्यालयांतर्गत ५३, धुळे ग्रामीण ६९, साक्री ४६, पिंपळनेर १७, शिरपूर ६३, शिंदखेडा ४५, दोंडाईचा अपर तहसील कार्यालय १८ अशा प्रकारे पथकांनी कारवाई केली असून संबंधित वाहनचालकांकडून दंडात्मक वसुली केली आहे. 
आतापर्यंत १९ पैकी ३ वाळू घाटांचा लिलाव 
जिल्ह्यात यंदा विभागीय आयुक्त कार्यालयाने १९ वाळू घाटांची अपसेट प्राईज निश्चित करून दिली होती. त्यात साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरुन दातर्ती १, दातर्ती २, शिंदखेडा तालुक्यात तापी नदीवर कमखेडा , आच्छी १, आच्छी २, हिसपूर १,  हिसपूर २ , टाकरखेडा, शिरपूर तालुक्यातील साहूर, जापोरा, उप्परपिंड १, उप्परपिंड २, पाथर्डे, खर्दे खुर्द, सावळदे, कुरखळी-१, कुरखळी २, वाठोडे, तºहाडी या वाळू घाटांचा समावेश होता. परंतु, या वाळू घाटांपैकी शिंदखेडा तालुक्यातील आच्छी २ व शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड १ व २  या वाळू घाटांचा लिलाव झाला. उर्वरीत वाळू घाटांचा लिलाव अद्याप झालेला नाही.

Web Title: Action for 311 vehicles in Dhule district in 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.