शिरपूरला ९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:48 PM2020-04-27T21:48:01+5:302020-04-27T21:48:24+5:30
आदेशाचा भंग भोवला : ठरवून दिलेली वेळ पाळली नसल्याचा ठपका
शिरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच गर्दी टाळण्यासाठी व्यावसायिकांना काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत़ त्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी वेळ ठरवून दिलेली असताना देखील त्या व्यतिरिक्त व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या ९ दुकानदारांविरुध्द शिरपूर येथील मुख्याधिकारी यांनी कारवाई केलेली आहे़
शिरपूर शहरात लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू किराणा दुकान, दूध, भाजीपाला, फळांची विक्री करण्याकरीता सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे़ या कालावधी व्यतिरिक्त आदेशाचा भंग करणाºया, आस्थापना सुरु ठेवणाºया दुकानदारांवर तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सोमवारी संयुक्तपणे कारवाई केली़ दरम्यान, नागरिक व व्यावसायिक यांना लॉकडाउनच्या काळात सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे बंधनकारक आहे़ तरी देखील नियमाचे उल्लंघन होत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले़
कारवाईत यांचा समावेश
या कारवाईत साक्रीया उपहार गृह, ए़ जी़ गुप्ता किराणा, महावीर स्वीट अॅण्ड जनरलर्स, साईकृपा प्रोव्हीजन, साई अॅग्रो सर्व्हिसेस, आऱ के़ सम्राट, खुशी किराणा, वशिम शेख करीम, संजयकुमार सुमतीलाल जैन या दुकानदारांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली़